शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

अखेर महसूल राज्यमंत्र्यांचा ‘तो’ आदेश रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 22:08 IST

शासन आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल दिल्यानंतरही पाच माजी सैनिकांना जमिनीचा ताबा देण्यात आला नव्हता. सीलिंग जमिनीचा ताबा मिळण्यासाठी १५ आॅगस्टपासून जिल्हा कचेरी परिसरात माजी सैनिकांनी कुटुंबीयांसह बेमुदत उपोषणास प्रारंभ केला होता. अखेर महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिलेला आदेश खारीज केला. यामुळे लवकरच जमिनीचा उपोषणकर्त्यांना ताबा मिळणार आहे. आदेश रद्द झाल्याबाबतचे पत्र महसूल विभागाने त्यांना दिले.

ठळक मुद्दे२८ वर्षांनंतर माजी सैनिकांना मिळाला न्याय : १४ दिवसानंतर सुटले उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासन आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल दिल्यानंतरही पाच माजी सैनिकांना जमिनीचा ताबा देण्यात आला नव्हता. सीलिंग जमिनीचा ताबा मिळण्यासाठी १५ आॅगस्टपासून जिल्हा कचेरी परिसरात माजी सैनिकांनी कुटुंबीयांसह बेमुदत उपोषणास प्रारंभ केला होता. अखेर महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिलेला आदेश खारीज केला. यामुळे लवकरच जमिनीचा उपोषणकर्त्यांना ताबा मिळणार आहे. आदेश रद्द झाल्याबाबतचे पत्र महसूल विभागाने त्यांना दिले.महसूल राज्यमंत्री यांचे न्यायालयात (प्रकरण क्रमांक अपील २०१८/प्रक्र. ५९/ल-७) अन्वये २८ आॅगस्ट २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार शेतमालक विरुद्ध प्रतिवादी अपर आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय या प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम २५७ अन्वये निकालपत्र जाहीर करताना यापूर्वीचे आदेश खारीज करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल राज्यमंत्र्यांनी कागदपत्रे व युक्तिवाद तपासून मंगळवारी काढलेल्या निष्कर्षानुसार याप्रकरणी वादी शेतमालकाच्या सीलिंग कायद्यान्वये अतिरिक्त घोषित करण्यात आलेल्या जमिनींसंदर्भात हरकत व दावे याबाबत अतिरिक्त भूनिर्धारण न्यायाधिकरण, महसूल न्यायाधिकरण (नागपूर), मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने वेळोवेळी दिलेले आदेश पारित केले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने सीलिंग कायद्यांतर्गत कार्यवाही आणि सुनावणी घेण्याचे अधिकार प्राप्त नसल्याने याबाबत शेतमालकाने न्यायालयात दाद मागणे उचित होईल. न्यायालयाने पारित केलेले ५ जून २०१८ रोजी अंतरिम आदेश रद्द करून प्रकरण दाखल करण्याच्या टप्प्यावरच फेटाळणे कायदेशीर ठरेल, असे आदेश महसूल राज्यमंत्र्यांनी काढले आहे. माजी सैनिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडे आ. रवि राणा यांच्यासह अन्य सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला.माजी सैनिकांचे तब्बल १४ दिवसानंतर बेमुदत उपोषण नवनीत राणा, कमलताई गवई यांच्या हस्ते लिंबू पाणी पाजून सोडविण्यात आले. यावेळी कैलास मोेरे, सुमती ढोके, जितू दुधाने, पंजाब मडावी, दिलीप खंडारे, हिंमत ढोले, सावन मसले, सविता भटकर, अनिता वानखडे, करण गायकवाड, जगदीश वाकोेडे, योगेश घुगरे यांच्यासह उपविभागीय अधिकारी विनोद शिरभाते, तहसीलदार अजित येडे, भूमिअभिलेखचे उपअधीक्षक सचिन पवार आदी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायासाठी साकडेजमिनीचा ताबा मिळण्यासाठी २४ जुुुलै २०१८ रोजी अन्यायग्रस्त माजी सैनिक व भूमिहीन यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन दिले होते. मात्र, प्रश्न सोडविण्यात प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे १५ आॅगस्टपासून माजी सैनिक गजानन मसले, रामेश्वर शेंद्रे, शंकर मोहोड, कुरण भटकर, माना फुल्या ढोके, पंजाबराव जवंजाळ, श्रीकृष्ण इंगळे आदींनी बेमुदत उपोषण केले होते. २८ वर्षांचा संघर्षाला बुधवारी विराम मिळाला.माजी सैनिकांना शेतजमीन ताबा देणेप्रकरणी अपिल खारीज झाल्याचे पत्र मिळाले आहे. त्यानुसार नियमानुसार कार्यवाही केली जाईल. मोजणीप्रमाणे सीलिंग जमीन वाटपातील पात्र लाभार्थींना ताबा देण्याची प्रक्रिया केली जाईल.- विनोद शिरभाते, उपविभागीय अधिकारी, भातकुली.