शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर मंत्र्यांचे ‘पीए’ ठरले; १७ मंत्री अद्याप ‘पीए’विना, महसूल विभागातील १५ अधिकारी नियुक्त

By गणेश वासनिक | Updated: January 20, 2025 19:39 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाचा धडाका सुरू केला असताना त्यांचे सहकारी मात्र आवडीतील ‘पीए’च्या शोधात होते. अखेर हा शोध संपला आहे.

अमरावती : राज्य मंत्रिमंडळाचे गठण झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने कामकाजास गती मिळाली असून, मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी चाळणी लावून त्यांचे स्वीय सहायक (पीए) निवडले आहेत, तर मंत्रिमंडळातील १७ मंत्र्यांना अद्याप चांगल्या ‘पीए’चा शोध आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाचा धडाका सुरू केला असताना त्यांचे सहकारी मात्र आवडीतील ‘पीए’च्या शोधात होते. अखेर हा शोध संपला आहे. सामान्य प्रशासन विभागाने १७ जानेवारी रोजी मंत्र्यांसाठी ‘पीए’ आणि विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. शासनाच्या कार्यालयीन आस्थापनेवर असलेल्या वर्ग १ व वर्ग २ च्या अधिकाऱ्यांना आता मंत्र्यांच्या सेवेत ‘ऑन ड्युटी’ तैनात करण्यात आले आहे. असे असले तरी स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी असल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र वित्त विभागाच्या मान्यतेसह द्यावे लागणार आहे.कोण कुणाचे पीएउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र काळे,

उपमुख्यमंत्री अजित पवार : पशुधन विकास अधिकारी डॉ. अमर भडंगे,

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे : अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींमी, तहसीलदार प्रशांत पाटील व कक्ष अधिकारी राहुल गांगुर्डे,

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील : उपायुक्त जयदीप पवार, नायब तहसीलदार डॉ. गौरी शंकर चव्हाण,

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ : अवर सचिव नंदकुमार आंदळकर, उपमुख्य कार्यकारी भूपेंद्र बेडसे,

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील : लेखापरीक्षक बाळासाहेब यादव,

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे : मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत भामरे,

कौशल्य व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा : उपजिल्हाधिकारी महेश शेवाळे, पंकज पाठक,

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे : अपर जिल्हाधिकारी मंदार वैद्य,

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके : उपजिल्हाधिकारी ललीत वऱ्हाडे, डीपीओ मुरलीधर वाडेकर आणि तहसीलदार सुरेश कव्हाळे,

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे : उपसचिव संतोष गावंडे,

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले : एसडीओ सुधाकर भोसले,

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे : सहसचिव संतोष पाटील,

अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ : उपजिल्हाधिकारी मुकेश भोगे,

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे : उपसचिव प्रल्हाद रोडे,

सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट : उपलेखा अधिकारी अभय देशमुख,

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक : सहायक आयुक्त शरद खाडे,

रोहयो मंत्री भरत गोगावले : अवर सचिव गणेश काथवटे,

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील : उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील.१७ मंत्र्यांना पीएची प्रतीक्षाराज्य मंत्रिमंडळातील मंत्री संजय राठोड, नितेश राणे, उदय सामंत, गिरीश महाजन, गुलाबराब पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, जयकुमार रावल, अतुल सावे, शंभुराज देसाई, आशिक शेलार, आदिती तटकरे, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, आकाश पुंडकर, प्रकाश आबिटकर या १७ मंत्र्यांना पीएचा शोध असणार आहे.केवळ चार राज्यमंत्र्यांंना पीएराज्यमंत्री म्हणून सहा आमदारांनी शपथ घेतली. त्यातील केवळ चार राज्यमंत्र्यांना पीए मिळाले आहे. यात पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक, माधुरी मिसाळ यांचे भाग्य उजळले. योगेश कदम आणि आशिष जयस्वाल हे पीएविना आहेत.

टॅग्स :guardian ministerपालक मंत्री