शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव; शिवपरिवारात आनंदोत्सव

By गणेश वासनिक | Updated: January 13, 2023 15:17 IST

प्रलंबित मागणी पूर्ण; शासन पत्रव्यवहार नावाचा उल्लेख, जिल्हा परिषदेत तीन वर्षांपूर्वी झाला होता ठराव पारित

अमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाला अखेर राज्य शासनाने देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख असे नामकरण केले आहे. गत तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बेलाेरा विमानतळाला डॉ. भाऊसाहेबांचे नाव देण्यासंदर्भात प्रस्ताव मंजूर करून तो शासन निर्णयार्थ पाठविण्यात आला होता, हे विशेष.

बेलोरा विमानतळाहून विमानांचे टेकऑफ या मुद्द्यावरून जिल्ह्यातील नेत्यांमध्ये राजकीय द्वंद सुरू आहे. मात्र, ११ जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चॉर्टर विमानाने अमरावती दौऱ्यावर आले असता ते मुंबई येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बेलोरा विमानतळावर आले होते. ना. फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री कार्यालयातून अधिकृत दौरा प्रशासनाला पाठविण्यात आला होता. यात उपमुख्यमंत्री फडणवीस हे व्हीटी- व्हीआरए या विमानाने डॉ. पंजाबराव देशमुख विमानतळावर आगमन करतील, असा उल्लेख

होता. त्यामळे शासनस्तरावर बेलोरा विमानतळाचे डॉ. पंजाबराव देशमुख विमानतळ असे नामकरण झाले, हे शिक्कामोर्तब केले आहे. ना. फडणवीस यांच्या विमानतळावरील दौऱ्यासंदर्भात विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस अधीक्षक अविनाश बारगड, राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त तसेच मंत्रालयाचे राजशिष्टाचार सचिव यांना कळविण्यात आला होता. बेलोरा विमानतळ हे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येत असून, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ हे देखील याच तालुक्यातील आहे.

विमानतळाची कामे प्रगतिपथावर

बेलोरा विमानतळाची संरक्षण भिंत पूर्णत्वास आली आहे. प्रत्यक्ष धावपट्टीचा टायरिंग कोट पूर्ण झालेला आहे. विमानतळ येथून एटीआर- ७२ प्रकारातील प्रवासी विमानाचे उडाण सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय ईमारत , टर्मिनल बिल्डिंग, एटीसी टावर आदी विकासकामांसाठी ५९ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. केवळ एजन्सी निश्चित होणे बाकी आहे.

गत तीन वर्षांपूर्वी बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यासंदर्भात प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला तीन ते चार सदस्यांनी अनुमोदन दिले होते. एकमताने हा ठराव मंजूर करून तो शासनाकडे पाठविला गेला होता. आता डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव मिळाल्याने राज्य शासनाने खऱ्या अर्थाने भाऊसाहेबांच्या कार्याची दखल घेतली आहे.

- प्रकाश साबळे, माजी सदस्य जिल्हा परिषद, अमरावती

टॅग्स :AirportविमानतळAmravatiअमरावती