शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर दोन बीटी बियाणे कंपन्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा, आसेगाव ठाण्यात तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 18:49 IST

जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील सात शेतक-यांना कंपनीने नमूद केल्यानुसार बियाणे दिलेले नाहीत, यामुळेच दोन बीटी बियाणे कंपनीविरूद्ध आसेगाव ठाण्यात सोमवारी उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

अमरावती : जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील सात शेतक-यांना कंपनीने नमूद केल्यानुसार बियाणे दिलेले नाहीत, यामुळेच दोन बीटी बियाणे कंपनीविरूद्ध आसेगाव ठाण्यात सोमवारी उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बीटी बियाणे कंपन्यांनी नमूद केलेल्या धोरणाप्रमाणे शेतक-यांना बियाण्यांची विक्री केलेली नाही. त्यामुळे कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला व शेतक-यांचे प्रति एकर सव्वा लाख रूपयांचे नुकसान झाले. त्यामुळे भातकुलीचे तालुका कृषी अधिका-याद्वारा सोमवारी सायंकाळी कृषी विभागाच्यावतीने आसेगाव ठाण्यात बियाणे कंपनीविरुद्ध कारवाई करावी, अशी तक्रार दाखल करण्यात आली. या  आधारे कावेरी व अजित सिड्स या दोन  बीटी बियाणे कंपनीविरुद्ध भादंवी ४२० व कलम १३ महाराष्ट्र सिड्स अ‍ॅक्ट २००९ अन्वये गुन्हा नोंदविला. मंगळवारी दुपारी आसेगाव पोलिसांनी पूर्णानगत तेथील सात शेतकºयांच्या बाधित पिकाचा पंचनामा केला

बियाणे कंपन्यांविरूद्ध विदर्भातील दुसरी तक्रारजिल्हा समितीच्या अहवालात ९६ टक्के बोंडे किडली असल्याने किमान एक लाख २५ हजारांचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. याविषयीची पहिली तक्रार अकोला येथे, तर दुसरी तक्रार आसेगाव ठाण्यात कृषी विभागाच्यावतीने दाखल झालीे. विभागात आठ लाख हेक्टर क्षेत्र बाधित असल्याने त्या शेतक-यांना न्याय व नुकसान भरपाई केव्हा, असा शेतकºयांचा सवाल आहे.

बुधवारी पुण्याला कृषी आयुक्तांनी बैठक बोलाविलीे. यामध्ये विभागातील बीटी कपाशीच्या नुकसानीची स्थिती सादर करणार आहोत. या बैठकीत शेतक-यांना दिलासाजनक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.- सुभाष नागरे,कृषी सहसंचालक

टॅग्स :Crimeगुन्हा