शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

आदर्श मतमोजणी केंद्रात अखेरच्या फेरीपर्यंत आकड्यांचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:44 IST

लोकशाहीच्या महोत्सवाचा गुरूवारी समारोप. त्यातही अमरावतीचे मतमोजणी केंद्राला भारत निवडणूक आयोगाने मुंबईसोबतच राज्यात आदर्श केंद्र म्हणून सन्मान दिला. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी ही सन्मानाची बाब ठरली.

ठळक मुद्देप्रत्येक फेरीनंतर संभ्रमावस्था । मीडिया कक्षातही तीच स्थिती, जबाबदार कोण?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकशाहीच्या महोत्सवाचा गुरूवारी समारोप. त्यातही अमरावतीचे मतमोजणी केंद्राला भारत निवडणूक आयोगाने मुंबईसोबतच राज्यात आदर्श केंद्र म्हणून सन्मान दिला. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी ही सन्मानाची बाब ठरली. मात्र, अखेरच्या दिवशी फेरीनहाय आकडेवारी जाहीर करताना जो काही घोळ शेवटच्या फेरीपर्यंत सुरू राहिला, त्यामुळे मतमोजणी केंद्रावरील प्रत्येकामध्ये संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा या ठिकाणी सुरू होती.पहिली फेरी आयोगाचे निर्देशाप्रमाणे सकाळी ८.३० ला सुरू झाली. त्यानंतर लगेच सुविधा पोर्टलवर अद्ययावत ट्रेंड यायला लागला. ईथवर सर्व ठीक चालले. मात्र, त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पहिली फेरी जाहीर केली. त्यांच्या उद्घोषणेप्रमाणे मतदान केंद्रात, मीडिया कक्षात व मतदानकेंद्राबाहेर सर्वांनी उमेदवारनिहाय मते टिपूण घेतली. मात्र दहा मिनिटांत सहा मतदारसंघनिहाय प्रत्येक उमेदवारांना किती मते मिळाली याचा लेखाजोखा मीडिया कक्षाला देण्यात आला. त्यामध्ये प्रमुख उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये काही मतांची तफावत दिसल्याने नक्की माहिती कोणती खरी याविषयी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ध्वनीक्षेपकाद्वारे जाहीर करण्यात आलेली उमेदवारनिहाय मते खरी मानावित की माहिती कक्षाद्वारा दिलेला फेरीनिहाय रिपोर्ट खरा मानावा, याविषयीचा संभ्रम कायम राहिला. प्रत्येक माध्यम प्रतिनिधींच्या आकडेवारीतला घोळ शेवटपर्यंत कायम होता. बºयाचदा उमेदवारांचे प्रतिनिधीदेखील माध्यम कक्षात येऊन विचारणा करीत होते. अखेरची फेरी जाहीर झाली. उमेदवारांना प्रमाणपत्र वितरित झाल्यानंतर देण्यात आलेली अंतिम मतमोजणीच्या स्थितीनंतर या घोळावर पडदा पडला. पहिल्या चरणातील दुपारी १२ वाजल्यानंतर मीडिया कक्षातील सुविधा पोर्टलची सुविधा अर्धा ते पाऊण तासापर्यंत बंद होती. त्याचवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर मात्र अमरावती लोकसभा मतदारसंघाचे अपडेट माहिती मिळत होती. त्यामुळे डिस्प्ले बंद ठेवण्याबाबतचा उद्देश काय होता, याची वाच्यता मात्र, निवडणूक विभागाने केली नाही. मीडियाचे नोडल अधिकारी यांनी 'नेट स्लो' असल्याचे थातूतमातूर कारण देऊन वेळ मारून नेली. संबंधित विधानसभा मतदारसंघातील मोजणी आटोपल्यानंतर निरीक्षकांच्या परवानगीने या मशीनमधील मतांची मोजणी करण्यात आली.१९ सीयूची मोजणी थांबविलीअमरावती अचलपूर व तिवसा विधानसभा मतदारसंघातील १९ ईव्हीएमचे मतदान प्रक्रिया झाल्यानंतरचे बटन बंद करावे लागते. मात्र, या सर्व मशीनचे बटन बंद न केल्यामुळे मतमोजणीच्या वेळी या सर्व मशीन सुरूच असल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे या मशीनच्या सीयूची मोजणी थांबविण्यात आली. यामध्ये अमरावती विधानसभेतील सात, तिवसा विधानसभेतील मतदान केंद्र १४, १०८, ११८ व १२५ अचलपुरातील मतदान केंद्र ८१, १०७, २८१ व १२९ आदी ठिकाणची मोजणी आयोगाचे मुख्य निरीक्षक दिनेशकुमार यांच्या परवानगीने त्या तेथील मोजणी आटोपल्यानंतर या सीयू (कंट्रोल युनीट) चे क्लोज बटन हे बंद करण्यात येऊन पुन्हा मोजणी करण्यात आली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल