शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

शिक्षकांच्या हक्कासाठी पोटतिडकीचा लढा- शेखर भोयर

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत सभागृहात आमदारांनी मौन बाळगल्याने शिक्षण क्षेत्र समस्येच्या खाईत ढकलले गेले आहे.

अमरावती : शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत सभागृहात आमदारांनी मौन बाळगल्याने शिक्षण क्षेत्र समस्येच्या खाईत ढकलले गेले आहे. शिक्षकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिक्षकांच्या हक्कासाठी पोटतिडकीने प्रयत्न करुन प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचे आश्वासन शेखर भोयर यांनी शिक्षकांना दिले.ते अकोला येथे प्रचार दौऱ्यादरम्यान शिक्षकांशी संवाद साधत होते. गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या स्वयंअर्थसहाय्यिता विधेयक तसेच शिक्षण हक्क कायदा आर.टी.ई. २००९ ची अंमलबजावणी करताना परिस्थितीनुसार शिक्षक प्रतिनिधींनी बदल सुचविले नाहीत. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती निर्माण झाली असून या क्षेत्राचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी एकजुटीने आवाज उठविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शेखर भोयर यांनी केले. शिक्षकांची संख्या अधिक आणि त्यांच्या नेत्यांकडे वेळ अत्यल्प, अशी अवस्था आज आहे. भाऊसाहेबांच्या मार्गावर चालून शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्याचे ध्येय मी उराशी बाळगले आहे. माझी संपूर्ण वेळ शिक्षकांसाठी उपलब्ध आहे. शिक्षकांसाठीची आपल्या सर्वांच्या मनातील व्यवस्था प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मला एकदा संधी द्या, असे अग्रही प्रतिपादन भोयर यांनी केले. काही उमेदवारांमार्फत जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. अशा भुलथापांना बळी न पडता शिक्षण क्षेत्राच्या अस्तित्वासाठी कार्यशील उमेदवारालाच संधी द्या, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद व विदर्भ जनसंग्राम शिक्षक संघटनेचे उमेदवार शेखर भोयर यांनी केले. मतदारसंघात सुरू असलेल्या शेखर भोयर यांच्या झंझावाती प्रचारसभांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. (प्रतिनिधी)