वसुधा देशमुख यांचा संकल्प : चावलमंडी, टांगा चौकात प्रचार कार्यालयाचे उद्घाटनअमरावती : माझ्या कार्यकाळात झालेली विकासकामे जनतेसमोर आहेत. परंतु अलीकडे मतदारसंघाचा विकास पार खुंटलाय. या विकासाला गती देण्यासाठीच पुन्हा निवडणूक लढवीत आहे, असे प्रतिपादान अचलपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार वसुधाताई देशमुख यांनी केले. स्थानिक टांगा चौक व चावलमंडी परिसरात निवडणुकीच्या प्रचारार्थ त्यांचे प्रचार कार्यालय उघडण्यात आले आहे. बाळासाहेब वानखडे यांच्या पुढाकाराने टांगा चौकात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ब्राह्मणसभा, देशपांडे प्लॉट, खापर्डे प्लॉट परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. चावलमंडी येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष ल.ज. दीक्षित, विलास काशिकर आदी वसुधातार्इंच्या प्रचाराकरिता मैदानात उतरले आहेत. परिसरातील मतदारांचा वसुधातार्इंना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुस्लिम नगरसेवकदेखील तार्इंच्या प्रचारार्थ झटत असल्याने मतदारसंघात तार्इंची स्थिती प्रबळ होत असल्याचे चित्र आहे. कार्यकर्त्यांच्या सहकार्याने वसुधातार्इंची झपाट्याने वाटचाल सुरू आहे. यावेळी विलास काशिकर, अनिल ठाकरे, नगरसेवक पवन बुंदेले, शाकिराभ शाकिरभाई, एहतेशाम, लल्लन दीक्षित, नगरसेवक अमिर पहेलवार, अनिल कडू आदी उपस्थित होते. मतदार व कार्यकर्त्यांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल वसुधाताई देशमुख यांनी आभार मानले.
विकासाला गती देण्यासाठी मैदानात
By admin | Updated: October 7, 2014 23:27 IST