शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

संचारबंदीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे भय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:01 IST

टवलारची लोकसंख्या तीन हजारांच्या घरात असून, तीन वॉर्डांत हे गाव विभागले गेले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जंतुनाशक औषधांच्या तीन फवारण्यासह ब्लिचिंग पावडरचीही फवारणी करण्यात आली आहे. पाठीवरच्या पंपासह फॉगिंग मशीनने फवारणी करतानाचा लोकसहभागातून ट्रॅक्टरद्वारे गावात फवारणी पूर्णत्वास नेण्यात आली आहे.

ठळक मुद्दे३७ लोक होमक्वारंटाईन : टवलारमध्ये आठवडी बाजार बंद, आरती-नमाज घरूनच

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील टवलार ग्रामपंचायत अंतर्गत संचारबंदीत गावातील दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या भीतीपोटी संचारबंदीत गावात कुणीही विनाकारण फिरकत नसल्याचे निदर्शनास येत आहे. विनाकारण भटकणारेही या कॅमेऱ्याच्या दहशतीमुळे गावातच आपल्या घरातच थांबत आहेत.दरम्यान राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढसह मुंबई, पुणे येथून गावात परतलेल्या ३७ लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गावपातळीवर सरपंच शीला तायडे, उपसरपंच सुनील वरखडे, सचिव योगेश्वर उमक, ग्रामपंचायत कर्मचारी प्रमोद गाडगे, दिनेश पेठे, आकाश डोंगरे, पोलीस पाटील, अ‍ॅड. अभिजित कुंभारकर, आरोग्यसेवक दुरगुडे, आरोग्य पथक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस, बचतगट, शिक्षकांसह गाव समिती लक्ष ठेवून आहे.टवलारची लोकसंख्या तीन हजारांच्या घरात असून, तीन वॉर्डांत हे गाव विभागले गेले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जंतुनाशक औषधांच्या तीन फवारण्यासह ब्लिचिंग पावडरचीही फवारणी करण्यात आली आहे. पाठीवरच्या पंपासह फॉगिंग मशीनने फवारणी करतानाचा लोकसहभागातून ट्रॅक्टरद्वारे गावात फवारणी पूर्णत्वास नेण्यात आली आहे.गावातील रविवारचा आठवडी बाजारासह मंदिर, मस्जिद बंद असून घरूनच नमाज अदा केली जात आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. गृहभेटींवर भर देण्यात आला आहे. ग्रामपंचायतमधील साऊंड सिस्टीममधून गावकऱ्यांना मार्गदर्शन केल्या जात आहे. जनजागृती केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही गावाला भेट देऊन मार्गदर्शन केले आहे. गावकऱ्यांशी संवाद साधला आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्ही