चिवड्यात तळलेली पाल : चिवड्याचा नमुना प्रयोगशाळेत रवानाअमरावती : ‘जैन’ चिवड्यात तळलेली पाल आढळल्यासंदर्भातील वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ ने प्रकाशित केल्यानंतर शहरभरात चर्चेला उत आला होता. खाद्यपदार्थांची विश्वासार्हता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याने एफडीआयच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. लोकमतमधील यावृत्ताच्या अनुषंगाने मंगळवारी एफडीएने पालयुक्त चिवड्याची विक्री करणाऱ्या शामनगरातील ‘मातेश्वरी सेल्स’ वर धाड टाकून तपासणी केली. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी येथील चिवड्याचा एक नमुना घेतला असून तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. संजय गांधीनगरातील शरद महादेव पखाले नामक ग्राहकाने मातेश्वरी सेल्समधून २९ एप्रिल रोजी जैन उत्पादनाचा चिवडा खरेदी केला होता. पाकिट उघडून दोन-चार घास खाल्ल्यानंतर त्यात त्यांना तळलेली पाल आढळली होती. यामुळे थोड्या वेळात त्यांना मळमळ व उलट्यांचा त्रास जाणवू लागला होता.एफडीएच्या कार्यप्रणालीवर संशयअमरावती : त्यामुळे त्यांनी तत्काळ इर्विनमध्ये जाऊन उपचार सुद्धा करून घेतले. याबाबत पखाले यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली तसेच मातेश्वरी सेल्सच्या संचालकांनाही झालेला प्रकार सांगितला असता त्यांनी चिवडा बदलून देण्याची तयारी दर्शविली होती. शहरात खाद्यपदार्थांचा दर्जा व गुणवत्ता ढासळत असल्याचे अनेक घटनांवरून सिद्ध झाल्यानंतरही एफडीएच्यावतीने ठोस कारवाई केली जात नाही. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सेल्समन दुकानात माल देऊन जातो. तो कोण आहे, कोठून माल आणतोे, याबाबत माहिती नाही. - सुनीलकुमार शिवनानी,संचालक, मातेश्वरी सेल्स, शामनगरचिवड्याचा एक नमुना घेतला आहे. उत्पादकांपर्यंत जाऊन तपासणी करून माल कोठून आणला याचा शोध घेऊन संबंधितांना नोटीस पाठवू.- आर.एस.वाकोडे,अन्न सुरक्षा अधिकारी
‘मातेश्वरी सेल्स’वर एफडीएची धाड
By admin | Updated: May 3, 2017 00:12 IST