कार्बाईडचा वापर : दोषी आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईसंदीप मानकर अमरावतीअंबानगरीत कॅल्शियम कार्बाईडने आंबे पिकविले जात असलेल्या प्रकरणाची आपण माहिती घेऊन त्यासंदर्भातील अहवाल मागविण्यात येईल व या प्रकरणाच्या चौकशीअंती जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, अशी गंभीर प्रतिक्रिया 'लोकमत'शी बोलताना एफडीए आयुक्त मुंबई डॉ.हर्षदीप कांबळे यांनी दिली. आंबे पिकविण्यासाठी अनेक आजारला आमंत्रण देणाऱ्या घातक अशा कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत आहे. केळी, पपईसुध्दा कॅल्शियम कार्बाईडने पिकविली जात आहे. तसेच सफरचंदवर मेनाचे थर लावले जात आहे व कलिंगड लाल राहण्यासाठी रासायनिक पदार्थ इंजेकश्नव्दारे सोडले जात आहे. तसेच गुटख्यांची खुलेआम विक्री होत आहे. यासंदर्भात अन्न व औषधी प्रशासन आयुक्त हर्षदीप कांबळे यांना विचारणा केली असता, डॉ. कांबळे यांनी या प्रकरणाची दखल घेण्यात येईल व दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. गेल्या १५ दिवसांपूर्वी 'लोकमत'ने स्टींग करुन आंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत असल्याचे सहचित्र उघड केले होते. एवढेच नाहीतर केळीे, पपई हे फळे पिकविण्यासाठी देखील कार्बाईडचा व प्रमाणापेक्षा जास्त ईथेलीन गॅसचा वापर राजोरसपणे करण्यात येत आहे. फळे विक्रेते नागरिकांना फळांसोबत कॅन्सर सारखे आजार मोफत विकत आहेत. यातून घराघरात हे गंभीर आजार फोफावत आहेत. तसेच राज्यात गुटखाबंदी असताना अमरावती जिल्हयात एफडीएचे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री चालू आहे. एकही फळ असे नाही की नागरिकांनी आहारात घ्यावे, ज्यामध्ये रसायनिक पदार्थांचा वापर केल्या जात नाही. नागरिकांनी कुठल्या विश्वासाने फळे खावी, हा प्रश्न पडला आहे. सफरंचद जास्त काळ टिकावे व ते खराब होऊ नये यासाठी व्हॅक्स (मेनाचा थर) लावल्या जात आहे. चवदार कलिगंड लाल करण्यासाठी शरीराला हानीकारक असलेल्या इंजेकशनव्दारे रसायनिक द्रव्य सोडले जात आहे. हा प्रकार 'लोकमत'ने लोकदरबारात मांडून सहचित्र उघडकीस आणला. परंतु हा प्रकार रोखण्यासाठी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही ठोस पावले उचलली नाही. आपल्या कर्तव्याचा विसर पडलेल्या अधिकाऱ्यांनी अंबानगरीतील लोकांचे आरोग्य धोक्यात असतांना अद्यापही ते कुंभकर्णी झोपेतच आहेत. त्यामुळे एफडीएचे आयुक्त हर्षदिप कांबळे यांनी दखल घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे अमरावतीकरांसाठी ते एक आशेचे किरण ठरले आहे. कारण गेल्या दोन आठवडयापूर्वी अन्न व औषध पुरवठा मंत्री गिरीश बापट अमरावतीच्या दौऱ्यांवर आले असता त्यांना अमरावतीत सर्रास होत असलेला हा प्रकार पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिला. यावरून ना.गिरीश बापट काही तरी ठोस कारवाई करतील, अशी अपेक्षा होती. परंतू अधिकाऱ्यांनी ना. बापटांचीही दिशाभूल करण्यात आली. बापट खाली हात परत गेले. परंतु एफडीएच्या आयुक्तांकडून कारवाईची अपेक्षा आहे.
एफडीए आयुक्त गंभीर
By admin | Updated: May 19, 2016 00:14 IST