शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कलेवर पाहताच वडील बेशुद्ध; आईला हृदयविकाराचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:25 IST

सोमवारी सकाळी १० च्या सुमारास बारावीचा पेपर देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुलाचे कलेवर पाहून वडील बेशुद्ध पडले, तर आईला हृदयविकाराचा जबर धक्का बसला. गावही निस्तब्ध झाले. सोमवारी सकाळी लगतच्या दिया फाट्याजवळ १७ वर्षीय आदित्य नायडे याला भरधाव ट्रॅक्टरने उडविले. या घटनेने छोट्याशा दिया गावात स्मशानशांतता पसरली.

ठळक मुद्देबारावीच्या विद्यार्थ्याचा करुण अंत : दिया गावात स्मशानशांतता, दुचाकीस्वारांना ट्रॅक्टरने उडविले, नागरिकांची पोलीस ठाण्यावर धडक

पंकज लायदे।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : सोमवारी सकाळी १० च्या सुमारास बारावीचा पेपर देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुलाचे कलेवर पाहून वडील बेशुद्ध पडले, तर आईला हृदयविकाराचा जबर धक्का बसला. गावही निस्तब्ध झाले. सोमवारी सकाळी लगतच्या दिया फाट्याजवळ १७ वर्षीय आदित्य नायडे याला भरधाव ट्रॅक्टरने उडविले. या घटनेने छोट्याशा दिया गावात स्मशानशांतता पसरली.दिया येथील आदित्य प्रकाश नायडे व त्याचा मित्र आकाश चिरंजीलाल मावसकर हे दोघे दहेंडा येथे इयत्ता बारावीचा भौतिकशास्त्राचा पेपरसाठी सोमवारी दिया येथून निघाले होते. रस्त्याने जात असताना दिया फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. त्यात आदित्यचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती गावात पसरताच मृत आदित्यच्या नातेवाइकांनी घटनास्थळावर धाव घेतली. सदर घटनाक्रम बघून आदित्यचे वडील प्रकाश नायडे घटनास्थळीच बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने रुग्णालात नेण्यात आले. तथापि, घरी असलेली त्याची आई सीमा नायडे यांना मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच त्या हृदयविकाराचा धक्का आल्याने खाली कोसळल्या. त्यांना उतावली येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. तसेच आदित्यचा भाऊ अनिकेत हा सारखा विलाप करीत होता. मुळात हुशार असलेल्या आदित्यने इयत्ता अकरावीत विज्ञान शाखा निवडून नियमित अभ्यास व नियोजनबद्ध परीक्षेची जोरदार तयारी केली होती. बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण घेऊन त्याने उच्च शिक्षणाची कास धरली होती. मात्र काळाने झडप घातली अन् होत्याचे नव्हते झाले. त्याच्या अकाली मृत्यूने नायडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.अनिलची मन:स्थिती नसताना दिला बारावीचा पेपरआदित्य आणि अनिल मावस्कर हे जीवाभावाचे मित्र होते. सोमवारी ते दोघेही एकाच दुचाकीने परीक्षा केंद्राकडे निघाले. मात्र दिया गावाकडे परत जाताना अगदी गावाजवळच ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. आदित्य दुचाकी चालवत होता. या अपघातात अनिलही जखमी झाला. तो अपघाताचा प्रत्यक्षदर्शी असल्याने जमावाने त्याला आधी पोलीस तक्रार देण्याचा आग्रह धरला. अपघाताची तक्रार दिल्यानंतर आणि जीवाभावाचा मित्र गणावल्याने अनिलची मनस्थिती बिघडली. मात्र आईवडील व मित्राच्या आग्रहास्तव त्याने पोलीस ठाण्यातून सरळ दहेंडा येथील परीक्षा केंद्र गाठून जखमी अवस्थेत बारावीचा पेपर सोडविला.अन् ते धावत सुटलेआदित्यच्या कुटुंबात वडील प्रकाश, आई सीमा, भाऊ अनिकेत व बहीण रोशनी असे सदस्य आहेत. प्रकाश नायडे हे दिया गावातच मत्सव्यवसाय करतात. आदित्यचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळताच ते घटनास्थळावर अक्षरश: धावून गेले अन् त्याला बघताच बेशुद्ध झाले. आपला भाऊ गेला यावर आदित्यच्या भावंडांचा विश्वासच बसेना.