शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांवर जादुटोणा केल्याचा संशय; पुतण्याने जाळले काकाचे घर!

By प्रदीप भाकरे | Updated: August 28, 2023 15:20 IST

आरोपी अटकेत, गुन्ह्याची कबुली : खल्लार फाट्यावरील घटना, एलसीबीची यशस्वी कारवाई

अमरावती : वडिलांवर काकाने जादुटोणा केला होता. त्यामुळे आपल्या वडिलांची तब्येत ढासळत चालली होती, त्याचा राग मनात धरून आपण काकाचे हॉटेल वजा घर पेट्रोल टाकून जाळून टाकल्याची कबुली आरोपी पुतण्याने दिली आहे. अनिकेत विनायक वानखडे (२३, रा. गौरखेडा) असे अटक आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेने २८ ऑगस्ट रोजी त्याला अटक केली. याप्रकरणी खल्लार पोलिसांनी पंडितराव वानखडे यांच्या तक्रारीवरून २७ ऑगस्ट रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास खूनाचा प्रयत्न व आग लावून नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

खल्लार येथील पंडित प्रल्हादराव वानखडे (५१) यांचे खल्लार फाटयावर माऊली स्वीट मार्ट नावाचे हॉटेल आहे. ते परिवारासह हॉटेलच्या वरच्या मजल्यावर राहतात. २६ ऑगस्ट रोजी रात्री ११ च्यादरम्यान घरात सर्वजन झोपले असतांना अज्ञात इसमाने त्यांच्या घरात पेट्रोल टाकून जिवे मारण्याचे उददेशाने आग लावली. त्यात त्यांचे संपुर्ण घर जळून ५.७० लाख रुपयांचेे नुकसान झाले. २७ ऑगस्ट रोजी रात्री १२.१५ च्या सुमारास तो प्रकार उघड झाला. यात फिर्यादी पंडितराव यांचा मुलगा जखमी असून, त्याला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

अशी दिली कबुली

याप्रकरणी खल्लार पोलिसांत दाखल गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीबाबत माहिती मिळाली. पंडितराव वानखडे यांचे घर त्यांचा पुतण्या अनिकेत वानखडे याने जाळल्याच्या माहितीवरून त्याला ताब्यात घेण्यात आले. प्रथम उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या अनिकेतने पोलीस खाक्या पाहताच घटनेची कबुली दिली. काही दिवसांपुर्वी आपल्या वडिलांवर आपल्या काकाने जादुटोना केला होता. त्यामुळे वडिलांची तब्येत खराब राहत होती. याचा राग आपल्या मनात होता, सबब, आपण काकाच्या घरात पेट्रोल टाकून आग लावली. तथा त्यांना जिवाने मारण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली दिली.

यांनी केली कार्यवाही

पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधिक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी गुरूनाथ नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, व खल्लारच्या ठाणेदार चंद्रकला मेसरे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक संजय शिंदे, अंमलदार सुधीर बावणे, निलेश डांगोरे, अमोल केंद्रे, विशाल हरने, परेश श्रीराव, अनुप देशमुख, गोपाल सोळंके, विजय निमखंडे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती