शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे बाप, मोर्शीत आढळला 18 सेमी लांबीचा 'खापरखवल्या' साप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 16:53 IST

खापरखवल्या : 12 वर्षांनंतर झाली दुसरी नोंद 

मोर्शी (अमरावती) : अतिशय दुर्मीळ समजला जाणारा खापरखवल्या साप सालबर्डीलगत रस्त्याच्या कडेला रविवारी सर्पमित्रांना आढळला. इलिओट्स शिल्डटेल प्रजातीच्या या सापाला हेल्प फाऊंडेशनचे संकेत राजूरकर, शुभम गायकवाड, प्रज्ज्वल वर्मा यांनी नैसर्गिक अधिवासात सोडले असून, 2006 नंतर अमरावती जिल्ह्यात या सापाची अवघी दुसरी नोंद झाली आहे.

खापरखवल्या हा 18 सेमी लांबीचा सर्वात लहान साप असून, सातपुडा पर्वतरांगेत त्याचे वास्तव्य असल्याची नोंद ‘स्नेक्स ऑफ इंडिया’ या मिलिंदकुमार खैरे यांच्या पुस्तकात आहे. पावसाळ्यातच जमिनीबाहेर येणारा हा साप वर्षभर जमिनीत वास्तव्य करतो. गांडूळ हे त्याचे मुख्य खाद्य आहे. या सापाला हिवाळ्यात बाहेर बघून सर्पमित्रांनी आश्चर्य व्यक्त केले. 

सर्पमित्र रत्नदीप वानखडे यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार त्या सापाच्या मानेवरील, पाठीवरील, व शेपटीच्या भागाची स्केलने तंतोतंत मोजमाप केले व हा साप इलिओट्स शिल्डटेल प्रजातीचा असल्याची खातरजमा केली. रात्रीची वेळी असल्याने त्याला अमरावतीपर्यंत आणणे शक्य नव्हते. अखेर त्या सापाला सुरक्षितरीत्या जंगलात सोडण्यात आल्याची माहिती हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष रत्नदीप वानखडे यांनी दिली.

अशी आहे ओळखइलिओट्स शिल्डटेल या सापाची लांबी 18 सेंमी, डोळे खूप बारीक, तर शरीराच्या मानाने तोंड लहान व निमुळते असते. त्याच्या पोटावर पिवळे ठिपके व शेपटी आखूड व त्यावर एकूण 17 खवले खरबड किंवा घासल्याप्रमाणे दिसतात. या सापावर संशोधन झाले नसल्याने त्याची इंटरनेटवरसुद्धा अल्प माहिती आहे.

खापरखवल्या साप दुर्मीळच आहे. परंतु त्याचा सातपुडा पर्वत रांगेत चिखलदरा येथे 13 ऑगस्ट 2006 रोजी प्रथम नोंद झाली आहे. - अशोक कविटकर,  सहायक वनसंरक्षक, अमरावती

टॅग्स :snakeसापAmravatiअमरावती