विदर्भातील संत्रा हा नागपुरी संत्रा नावाने ओळखला जातो. परंतु चांदूरबाजार अचलपूर या भागात ४-५ जुलै, ऑगस्ट महिन्यात संत्रा फळगळ मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. संत्रा उत्पादकांचे लाखो रुपयांचे यामुळे नुकसान होत आहे. याकरिता संत्रा लागवड ते फळ प्रक्रियेवर कार्यशाळा विदर्भ शेतकरी कृषिमाल प्रक्रिया आणि उद्योग प्राे. कंपनीचे सभागृहात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यामध्ये संत्रा कलम लागवड, ५ वर्षांनंतर फुलबहर, फळप्रक्रिया, खाेडकिडा तसेच फळगळ वायबार यावर गौरवराज सिंह शक्तावत झोनल मार्केटिंग मॅनेजर, विकास जोशी रिजनल मॅनेजर, हिना शर्मा प्रोडक्ट मॅनेजर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहर सुने माजी जि प सभापती हे होते तर प्रमुख पाहुणे प्रवीण खेरडे सरपंच, सुकदेवराव पवार जि प सदस्य, किरण सिनकर माजी सरपंच ,प्रा.रतीलाल सातपुते, प्रा.भुस्कटे गोविंदराव राजस ,प्रशांत मोहने हजर होते. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक अशोक याऊल संचालक यांनी केले तर आभार प्रदर्शन नीलेश राजस सीईओ कंपनी यांनी केले अाहे.