शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज करुनही शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 13:08 IST

Amravati : नवीन कनेक्शनकडे दुर्लक्ष, वाढोणा रामनाथ परिसरातील शेती ओलितापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कवाढोणा रामनाथ : शेतात विहीर आहे. काहींकडे बोअरवेल आहे. त्याला मुबलक पाणी आहे. त्यामुळे शेतात दुबार पीक घेऊन उत्पन्न वाढविण्याची, त्यासाठी परिश्रम घेण्याची शेतकऱ्यांची तयारी असली तरी वीज जोडणीसाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ परिसरातील शेतकऱ्यांची ही व्यथा आहे.

काही शेतकऱ्यांकडे शेतामध्ये विहिरी आहेत. त्यामध्ये मुबलक पाणी आहे. परंतु, नवीन वीज जोडणी गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना देणे बंद करण्यात आल्याने पाणी असूनही ओलिताची पिके घेता येत नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनकरिता महावितरणकडे अर्ज केला. परंतु, त्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. वाढोणा येथील शेतकरी प्रफुल्ल वडवाले यांनी सन २०१६ मध्ये महावितरणकडे वीजपुरवठ्यासाठी ६२०० रुपयांचा भरणा केला होता. त्यांनी अनेक चकरा महावितरण कार्यालयाकडे मारल्या. परंतु त्याचा काही उपयोग झालेला नाही. बागायती शेती करण्यापासून महावितरणने वंचित ठेवल्याचा त्यांचा आक्षेप आहे.

सौरऊर्जेची सक्तीशेतकऱ्यांनी शेतामध्ये सौरऊर्जाचलित वीजपुरवठा घेऊन ओलिताची शेती करावी, असा अलिखित नियम महावितरणकडे आहे. परंतु, माकडे व इतर वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे सोलर पॅनलची तूटफूट होते आणि वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे हा पर्याय महागडा ठरत आहे. महावितरणकडे वीज जोडणीबाबत विचारणा केल्यास, सौरऊर्जा संयंत्रावर ९० टक्के अनुदान आहे, ते घ्या, असा धोशा लावला जात असल्याचे शेतकयांचे म्हणणे आहे.

३० ऑगस्ट २०२३ पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत, त्यांनाच वीज कनेक्शन देण्यात येत आहे. त्यानंतर येणाऱ्या अर्जासाठी फंड नसल्यामुळे वीज पुरवठा करणे बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सौरऊर्जेचा वापर करावा.- सुनील शिंदे, अधीक्षक अभियंता, महावितरण 

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरीfarmingशेतीAmravatiअमरावती