पान २
कावली वसाड : गतवर्षी सरासरी पावसाळा झाल्यामुळे प्रत्येकाच्या विहिरीतील पाण्याची पातळी वाढली. परिणामी, शेतकऱ्यांनी रबी हंगामात भुईमूग व तीळ पिकांची पेरणी केली. मात्र, वन्यप्राण्यांचा त्रास वाढल्याने २४ तास पिकांची रखवाली करण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्र शेतातच काढावी लागत आहे.
यावर्षी शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. हरभरा आता कापणीवर आला. पण, रानडुक्कर, रोही, हरिण हे वन्यप्राणी शेतात धुमाकूळ घालत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी शेताला काटेरी कुंपणासोबतच तारेचे कंपाऊंडसुद्धा केले आहेत. परंतु, त्या कुंपणावरून उडी घेऊन नीलगाय व हरिण, वानरांचा कळप शेतात शिरकाव करीत आहेत. रानडुकरांच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांना गंभीर दुखापतीला सामोरे जात असताना वनविभागाचे हे मौन संतापात भर टाकणारे ठरत आहे.