शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
4
'गुगल' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
5
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
6
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
7
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
8
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
9
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
10
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
11
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
12
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
13
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
14
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
15
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
16
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
17
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
18
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
19
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
20
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!

एरड येथील शेतक-यांनी कपाशीत घातला ट्रॅॅक्टर, पिकाने शेतक-यांना लावले देशोधडीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 21:34 IST

अमरावती : एरवी कपाशीचे बोंडही गळू नये, याची काळजी वाहणारा शेतकरी ट्रॅक्टर घालून संपूर्ण पीक जमीनदोस्त करीत आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील एरड येथील हे चित्र आहे. बीटीचे फसलेले तंत्रज्ञान व त्यावर मात करणारी बोंडअळी याला कारणीभूत आहे

धीरेंद्र चाकोलकर अमरावती : एरवी कपाशीचे बोंडही गळू नये, याची काळजी वाहणारा शेतकरी ट्रॅक्टर घालून संपूर्ण पीक जमीनदोस्त करीत आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील एरड येथील हे चित्र आहे. बीटीचे फसलेले तंत्रज्ञान व त्यावर मात करणारी बोंडअळी याला कारणीभूत आहे. एकरी २० क्विंटल उत्पादन आणि दोन वर्षांपूर्वी हाती एक लाख रुपये रोख देणारे पीक असलेली, पाच फुटांच्यावर वाढलेली बीटी प-हाटी बोंडअळीच्या उत्पातामुळे उपटूून टाकण्याचा निर्णय एरड येथील शेतक-यांनी घेतला. त्यानुसार येथील भूषण देशमुख यांनी ड्रिपवर वाढविलेली अडीच एकरांतील प-हाटी मोडून टाकली. ते वडिलांच्या नावे असलेली शेती पाहतात. त्यांना दरवर्षी एकरी २० क्विंटल कापूस हमखास होतो.यावर्षी त्यांनी बीजी-२ प्रकाराचे कपाशी बियाणे लावले. कापूस घरी येईपर्यंत ४० हजार रुपये खर्च केले. ५० क्विंटलचा अंदाज असताना आतापर्यंत अवघा पाच क्विंटल कापूस घरी आला आहे. हीच परिस्थिती गावातील अनेक शेतकरी अनुभवत आहेत. शेतातील प-हाटी हिरवीगार असली तरी अळीमुळे बोंडांच्या कवड्या झाल्या आहेत. फरदडची वाट पाहण्याऐवजी झाडे उपटण्याचा निर्णय घेऊन देशमुख यांनी पिकात ट्रॅक्टर घातला. त्याकरिता आता त्यांना ३००० रुपये लागतील, तर गोळा करण्यासाठी २००० रुपये मजुरांना द्यावे लागतील. प-हाटी तशीच उभी ठेवली, तर अळी प्रादुर्भाव पुढील वर्षीही होण्याची शक्यता आहे.गतवर्षापर्यंत एक-एक मजूर स्त्री कापसाची वेचाई करताना दिवसाला २० किलोचे गाठोडे घरी आणत होती. काही शेतक-यांनी एकरी २५ क्विंटल कापूस उत्पादनाचा आकडा गाठला. यंदा आतापर्यंत पाच क्विंटल कापूस घरी आला. या कापसातून मोठी रक्कम वेचाईची मजुरी देण्यातच जाणार आहे, असे भूषण देशमुख यांनी सांगितले. कापसापूर्वी २० क्विंटल सोयाबीन देशमुख यांनी अवघ्या ३६ हजारांत विकले. त्यातून काहीच हाती आले नाही, अशी त्यांची खंत आहे.कापसासाठी एरड प्रसिद्धच्कापसाच्या एकरी २०-२५ क्विंटल उत्पादन एरड येथे घेतले जाते. या भरवशाच्या पिकातूनच येथील शेतक-यांनी समृद्धी मिळविली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र, यंदा कासपाने फसगत केली. तालुका कृषी अधिका-यांनी पाहणी केली. यासंदर्भात जिल्हास्तरावर एसएओ आॅफिसवर गावातील आठ जणांच्या तक्रारी गेल्या आहेत. तथापि, या कार्यालयाकडून अद्याप पाहणी झालेली नाही. त्यामुळे नुकसानभरपाईची शक्यता मावळल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.भावाचीही मारामारबोंडअळीचा प्रादुर्भाव असलेल्या कापसाला दोन हजारांच्या खालीच मागणी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. कापूस बाजार समितीत न्यायचा, तर १०० रुपये क्विंटलने वाहतूक खर्च व रोख रकमेसाठी दलालाकडून काही कपात होते. मी अमृतराव देशमुख पॅटर्नचा अवलंब करीत ड्रिपवर प-हाटी वाढविली. हिरवीगार प-हाटी मोडताना वेदना झाल्या. गावातील इतरही शेतकरी याच निर्णयापर्यंत पोहोचले आहेत. घेतलेले कष्ट वाया गेले आहेत.- भूषण देशमुख, प्रगतिशील शेतकरी, एरड