शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

शेतकऱ्यांनो! फवारणी करताना घ्या काळजी; कृषी विभागाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 18:56 IST

Amravati news agriculture कीटकनाशकांची फवारणी करताना जीविताला कोणताही धोका होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन पंचायत समिती कृषी विभाग व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदर्यापूर तालुक्यात २७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड

अनंत बोबडे लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : दर्यापूर तालुक्यात एकूण २७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड असून, पिकावर कीड येऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शेतकऱ्यांकडून  कीटकनाशकांची फवारणी अधिक प्रमाणात करण्यात येत आहे. कीटकनाशकांची फवारणी करताना जीविताला कोणताही धोका होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन पंचायत समिती कृषी विभाग व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

किडीपासून पिके वाचविण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांचा आधार घेतो. परंतु फवारणी करताना आवश्यक ती काळजी घेत नसल्याने दोन वर्षांपूर्वी  अनेक शेतकऱ्यांना जीवाला मुकावे लागले. दरम्यान विषबाधा होऊन त्यांच्या जीविताची हानी होण्याच्या तीन वर्षांपूर्वीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्याचे आवाहन पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी उद्धव भायेकर व तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकार यांनी केले आहे.

ही घ्या काळजीलेबलमधील दिशानिर्देश काळजीपूर्वक वाचावेत आणि त्यांचे अनुसरण करावे. त्यावरील इशारा आणि सावधगिरीकडे विशेष लक्ष द्यावे.कीटकनाशकांचे रिकामे डबे, बाटल्या, खोकी आदींचा पुनर्वापर करू नये. कीटकनाशके हाताळताना सुरक्षिततेच्या दृष्टीने रबरी हातमोजे, लांब पँट आणि लांब बाहीचे शर्ट वापरावेत. कीटकनाशके वापरानंतर लगेच कपडे बदलून हात धुवावेत. उघड्या हातांनी कीटकनाशक औषधी कधीही ढवळू नयेत. त्याकरिता काठीचा वापर करावा.  शिल्लक द्रावण जमिनीत खड्डा करून पुरावे. नोझल स्वच्छतेसाठी तोंडाने फुंकू नये. त्यासाठी तार किंवा काडीचा वापर करावा. उपाशीपोटी फवारणी करू नये.

कीटकनाशकांच्या विषबाधेची लक्षणे:    अत्यंत अशक्तपणा आणि थकवा.:    त्वचा चुरचुरणे, जळजळणे, जास्त         घाम येणे, डाग पडणे.:    डोळ्यांना खाज सुटणे, जळजळ         होणे, पाणी गळणे, अंधुक दृष्टी,         बुबुळे लहान किंवा रुंद होणे.:    तोंड व घशात जळजळणे, लाळ         गळणे, मळमळ, उलट्या होणे,         ओटीपोटात दुखणे, अतिसार होणे.:    डोकेदुखी, चक्कर येणे, संभ्रम,         बेचैनी, स्नायू आखडणे, लडखडत         चालणे, अस्पष्ट बोलणे, फिट येणे,         बेशुद्धी.:    खोकला, छातीतील वेदना आणि         घट्टपणा, श्वास घेण्यास त्रास होणे,         घरघर करणे.

टॅग्स :Farmerशेतकरी