शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरीही झाला लाडका; २.७२ लाख खात्यात प्रत्येकी दोन हजार जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 11:40 IST

' नमो'चा चौथा हप्ता : आधार लिंक केलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी लाडका झालेला आहे. पीएम किसान योजनेचा १७ व्या हप्त्याला महिना उलटत नाही तोच बुधवारी राज्य शासनाच्या 'नमो शेतकरी महासन्मान योजने'चा चौथा हप्ता मंगळवारी वितरित करण्यात आला. जिल्ह्यात ई- केवायसी व आधार लिंकिंग केलेल्या २,७२,१९८ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक दोन हजार रुपये जमा होत आहेत. 

बीड जिल्ह्यातील परळी येथे बुधवारपासून राज्यस्तरीय कृषी महोत्सव साजरा केल्या जात आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात राज्य शासनाच्या 'नमो' योजनेचा चौथा हप्ता वितरीत करण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी मंगळवारी केली होती. या योजनेचे आतापर्यंत प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते यापूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. राज्य शासनाद्वारा 'नमो शेतकरी महासन्मान योजने'द्वारे शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांत सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाच्या 'पीएम किसान सन्मान' योजनेचा डेटा वापरण्यात येत आहे.

लाभ मिळणारे तालुकानिहाय खातेदार कृषी विभागाच्या माहितीनुसार, अचलपूर तालुक्यात २२,१८३, अमरावती १६,२७९, अंजनगाव सुर्जी १९,२४५, भातकुली १५,९९१, चांदूर रेल्वे १३,८७९, चांदूरबाजार २६,३३२, चिखलदरा १०,४८६, दर्यापूर २४,१२२, धामणगाव १७,९६६, धारणी १६,३१०, मोर्शी २५,०५२, नांदगाव खंडेश्वर २२,८०५, तिवसा १५,०६४ व वरूड तालुक्यात २६,४८४ शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.

२६२ खातेदारांनी सोडला योजनेचा लाभ 'नमो शेतकरी महासन्मान योजने'मध्ये पात्र असलेल्या २६२ शेतकरी खातेदारांनी या योजनेचा लाभ सोडला आहे, तसे पत्र यापूर्वी प्रशासनाला दिले आहे. यापैकी बहुतेक खातेदार हे लाभाच्या पदावर आहेत, तर काही सधन कास्तकार आहेत. पीएम किसान योजनेचा डेटा वापरण्यात आल्याने काही आयकरदात्या शेतकऱ्यांची नावे या योजनेत समाविष्ट झाली होती.

टॅग्स :FarmerशेतकरीfarmingशेतीAmravatiअमरावती