शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या रुद्रावतारानंतर कृषी अधिका-यांचा शेतातून काढता पाय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 16:39 IST

संतप्त शेतक-यांच्या रोषामुळे जसापूर येथे नुकसानाचे सर्वेक्षण करण्यास गेलेल्या कृषी अधिका-यांना शेतातून काढता पाय घ्यावा लागला.

चांदूर बाजार (अमरावती) - संतप्त शेतक-यांच्या रोषामुळे जसापूर येथे नुकसानाचे सर्वेक्षण करण्यास गेलेल्या कृषी अधिका-यांना शेतातून काढता पाय घ्यावा लागला. चांदूर बाजार तालुक्यात संत्र्याची फळगळ मोठी असल्याने शेतकरी जेरीस आले आहेत. दोन वर्षांपासून नागपूर येथील एनआरसीच्या शास्त्रज्ञांनी सुचविलेल्या उपाययोजना करूनही ही गळती थांबली नाही. तालुक्यातील जसापूर येथे जिल्हा कृषी विभागाचे अधिकारी व अकोला येथील कृषी विभागाचे शास्त्रज्ञ हे संत्राउत्पादक शेतकरी अभिजित पोहोकार व प्रदीप बंड यांच्या शेतात गेले. मात्र, नागपूर एनआरसीच्या शास्त्रज्ञांकडून शेतक-यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचे सांगत संतापलेल्या शेतकºयांनी या पथकाला शेतातून अक्षरश: हाकलून लावले. यावर्षीच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने मृग बहर हातचा गेला. दुसरीकडे योग्य वातावरणाअभावी फुललेला आंबिया बहर कडाक्याचे उन्ह आणि अज्ञात रोगामुळे गळू लागला आहे. या फळगळतीबाबत कृषी विभागाने दोन वर्षांपासून मार्गदर्शन शिबिर घेतलेले नाही तसेच नेमक्या कोणत्या कारणामुळे फळगळ होते, याचे कारणही स्पष्ट केले नसल्याचा आरोप उपस्थित शेतकºयांनी केले आहे.नागपूर येथील एनआरसीच्या शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे फवारणी व खताची मात्रा देऊनही संत्र्याला गळती लागली. त्यामुळे गलेलठ्ठ पगार घेणारे शास्त्रज्ञांचा काय उपयोग, असा सवाल संतप्त शेतकºयांनी यावेळी पथकाला केला. शेतकºयांचा रूद्रावतार पाहून कृषी अधिकाºयांनी परतणेच इष्ट समजले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप भारसकळे, मंडळ कृषी अधिकारी यांच्यासह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ उपस्थित होते.    फळगळीच्या वेळी न दिसणारा कृषी विभाग व शास्त्रज्ञ त्यानंतर शेतक-यांना भेट देऊन जखमेवर मीठ चोळतात. लाखो रुपये पगार घेऊनही शेतक-यांचे नुकसान होत असेल, तर शासनाने या अधिका-यांवर कारवाई करावी. - प्रदीप बंड, शेतकरी, जसापूर  

गतवर्षी पंचायत समिती सभागृहात नागपूर एनआरसीच्या शास्त्रज्ञांनी जानेवारी ते फळ तयार होईपर्यंत पाच मार्गदर्शन शिबिरे घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. यावेळी शास्त्रज्ञांनी सूचविलेल्या सूचनेनुसार संत्राउत्पादक शेतकºयांनी पिकांना खत व औषधी दिल्या. तरीही फळगळ थांबली नाही. यानंतर एनआरसीच्या शास्त्रज्ञानी फिरकूनही पाहिले नाही. - अभिजित पोहोकार, शेतकरी जसापूर

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती