शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापूरच्या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे मागितली इच्छामरणाची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 23:00 IST

कर्जमाफी न मिळाल्याने दर्यापूर तालुक्यातील साईनगर येथील एका शेतक-याने इच्छमरणाची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहे.

दर्यापूर (अमरावती) : कर्जमाफी न मिळाल्याने दर्यापूर तालुक्यातील साईनगर येथील एका शेतक-याने इच्छमरणाची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहे. त्यांच्या कार्यालयाला पाठविलेल्या याच खलित्यात शेतक-याने आपली साडेचार एकर शेती शंभर रुपयांच्या मुद्रांकावर मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिली आहे.साईनगर येथील उच्चशिक्षित शेतकरी प्रमोद कुटे यांच्याकडे साडेचार एकर शेती आहे. ते स्वत: बी.एस्सी, तर पत्नी बी.कॉम. आहे. ते दरवर्षी काढलेल्या कर्जाची परतफेड करतात. २०१६ मध्ये त्यांच्यावर बँकेचे ७१ हजार कर्ज होते. नातेवाइकांकडून उसनवार व पत्नीचे दागिने अकोला येथे विकून त्यांनी कर्जाचा भरणा केला. २०१७ मध्ये त्यांनी ८१ हजार रुपये कर्ज काढले. परंतु ते रेग्युलर कर्ज भरत असल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.सरकारने नियमित कर्जदारांना २५ हजारांची भीक न देता, कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी प्रमोद कुटे यांनी आतापर्यंत राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री कार्यालयाशी पत्रव्यहार केला. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे मिळाली. यामुळे उद्विग्न स्थितीत आपल्या हातून काही विपरीत घडू शकते, या शंकेने त्यांनी १०० रुपयांच्या मुद्रांकावर मुख्यमंत्र्याच्या नावे शेती लिहून दिली. मुख्यमंत्र्यांनी आपली शेती विकून बँकेचे कर्ज वसूल करावे आणि उरलेले पैसे पत्नीच्या सांगण्यानुसार थकबाकीदारांना घ्यावे. उर्वरित पैसे इतर कर्जबाजारी शेतक-यांच्या खात्यात जमा करावे आणि पत्नीला किमान स्वच्छता विभागात कंत्राटी नोकरी द्यावी, अशी नोंद त्यांनी मुद्रांकावर केली आहे.मी अल्पभूधारक शेतकरी आहे. गतवर्षी नापिकी झाल्याने मी बँकेचे कर्ज भरू शकलो नाही. २०१६ मध्ये पत्नीचे सोने विकून कर्ज भरले. मात्र, सरकारने कर्ज माफ केले नाही. माझ्या ७५ टक्के गुण पटकाविणा-या मुलीला उच्चशिक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे मला इच्छमरणाची परवानगी मुख्यमंत्र्यांनी द्यावी.- प्रमोद कुटे, शेतकरी, साईनगर (दर्यापूर)

टॅग्स :Farmerशेतकरी