बोराळा येथे शेतकऱ्याने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 06:35 PM2020-10-11T18:35:41+5:302020-10-11T18:35:46+5:30

आपल्या साडेतीन एकर कोरडवाहू शेतीत त्यांनी यंदा सोयाबीन व तुरीची लागवड केली.

Farmer commits suicide at Borala | बोराळा येथे शेतकऱ्याने केली आत्महत्या

बोराळा येथे शेतकऱ्याने केली आत्महत्या

googlenewsNext

बेलोरा (अमरावती) : सवंगणी करून ठेवलेले सोयाबीन परतीच्या पावसाने सडल्यामुळे चांदूर बाजार तालुक्यातील युवा शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी ४ च्या सुमारास उघड झाली. सुरेंद्र ऊर्फ गणेश वसंतराव इंगोले (३९), असे मृत शेतकºयाचे नाव आहे.

आपल्या साडेतीन एकर कोरडवाहू शेतीत त्यांनी यंदा सोयाबीन व तुरीची लागवड केली. दोन तीन दिवसांपूर्वी त्यांनी सोयाबीन सवंगणी करून त्याची शिवारातच गंजी लावली. रविवारी दुपारी ३ च्या सुमारास ते शेतात गेले असता, परतीच्या पावसाने त्यातील काही सोयाबीन सडल्याचे दिसून आल्यामुळे ते विचारमग्न स्थितीत तासाभरात घरी पोहोचले व घरातच विषारी द्रव्य प्राशन केले.

कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना चांदूरबाजार ग्रामीण रुग्णालयात हलविताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचेवर सोसायटी व एका राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज होते. सोयाबीन हातचे गेल्याने कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत त्यांनी आत्मघात केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास जमादार विनोद बोबडे करीत आहे.

Web Title: Farmer commits suicide at Borala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी