शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

शेतातील केबल वायर चोर जेरबंद, तिघांना अटक; वाहनासह ४.२३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By प्रदीप भाकरे | Updated: October 8, 2023 14:32 IST

अन्य गुन्ह्यांची देखील कबुली, जिल्हयात मागील काही दिवसात शेतातील केबल वायर, मोटर पंप, स्प्रिंकलर व शेती संबधीचे साहित्य चोरीच्या घटना वाढल्या

अमरावती: शेतातील केबल वायर चोरणाऱ्या एका त्रिकुटाला स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी वाहनासह एकुण ४.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मेहफुज बेग मेहमुद बेग (३१), असलम शाह करीम शाह (३२) व आमीन शाह हयाद शाह (२४, तिघेही रा. अचलपूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर अन्य एक आरोपी फरार आहे.   

जिल्हयात मागील काही दिवसात शेतातील केबल वायर, मोटर पंप, स्प्रिंकलर व शेती संबधीचे साहित्य चोरीच्या घटना वाढल्या असल्याचे निदर्शनास येताच पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी ते गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरिक्षक सचिन पवार हे पथकासह ग्रामीण भागात केबल वायर चोरणाऱ्या आरोपींबाबत माहिती घेत होते. ७ ऑक्टोबर रोजी मेहफुज बेग याने परतवाडा येथे त्याच्या पांढ-या रंगाच्या चारचाकी वाहनात शेतातील चोरलेल्या केबलमधील तांबा तार लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने परतवाडा गाठून त्या वाहनाची झडती घेतली. त्यात अर्धवट जळालेला तांबा तार मिळून आला. मेहफुज बेग याला ताब्यात घेऊन त्याला विचारणा केली असता त्याने चोरीची कबुली दिली.

अशी मिळाली कबुली

साथीदार असलम शाह व आमिन शाह व एका अन्य सहकाऱ्यांच्या सोबतीने आपण मागील काही काळात शिरजगाव, खरपी, पुर्णानगर, वडुरा, टोंगलापुर, माधान, पांढरी शेतशिवारमधील शेतातून केबल वायर चोरली. केबलला जाळुन त्यातील तांबा तार विकण्याच्या तयारीत असल्याची कबुली मेहफुज बेग याने दिली. त्यानुसार त्या दोघांना अटक करण्यात आली. त्या दोघांनी देखील कबुली दिली.

सात गुन्हे उघडआरोपींनी दिलेल्या कबुलीवरुन शिरजगाव (कसबा), चांदुरबाजार व आसेगाव पुर्णा पोलीस ठाण्यात नोंद एकुण सात गुन्हे उघडकिस आले. आरोपींना शिरजगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक किरण वानख यांच्या नेतृत्वात पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाटे, शांताराम सोनोने, चालक संजय गेठे यांनी ही कार्यवाही केली.