शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

चिखलदऱ्यातील गाविलगड किल्ल्याची पडझड, ऐतिहासिक नोंदीचे शोधकार्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 5:00 AM

ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याला हजारो पर्यटक भेट देत असले तरी  पुरातत्त्व विभागाच्यावतीने आवश्यक त्या ऐतिहासिक नोंदी व माहिती देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शोधकार्य केले गेले नसल्याचे वास्तव आहे. या किल्ल्यावर एकीकडे भिंतीची डागडुजी करण्याचे काम पुरातत्त्व विभाग करीत असताना, किल्ल्यातील दुसऱ्या भागाची पडझड मात्र सुरूच आहे.

ठळक मुद्देअनेक वास्तू, भिंती कोसळू लागल्या ; व्याघ्र प्रकल्पाची नोटीस

  नरेंद्र जावरे    लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : ऐतिहासिक व विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा स्थित गाविलगड किल्ल्याची वाताहत होत असून, त्याला नामशेष होण्यापासून वाचवण्याची गरज आहे. गवळीगड ते गाविलगड अशी अनेक स्थित्यंतरे बघणाऱ्या या किल्ल्यात अनेक इतिहासकालीन स्मृती दडल्या आहेत. मात्र, कधी निधी, तर कधी व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक अटींमध्ये किल्ल्याचे जतन थांबले आहे.ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याला हजारो पर्यटक भेट देत असले तरी  पुरातत्त्व विभागाच्यावतीने आवश्यक त्या ऐतिहासिक नोंदी व माहिती देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शोधकार्य केले गेले नसल्याचे वास्तव आहे. या किल्ल्यावर एकीकडे भिंतीची डागडुजी करण्याचे काम पुरातत्त्व विभाग करीत असताना, किल्ल्यातील दुसऱ्या भागाची पडझड मात्र सुरूच आहे. महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती व योग्य जतन होत नसल्याने येणाऱ्या काही वर्षांत त्याची नोंद कागदावर राहण्याची भीती इतिहासतज्ज्ञ व पर्यटकांनी वर्तविली आहे. या किल्ल्ल्याला गवळीगड ते गाविलगड असा इतिहास असून, बहमनी, इंग्रज, भोसले, मोगल, राजा बेनिसिंग अशा राज्यकर्त्यांनी वऱ्हाडची राजधानी असलेल्या या किल्ल्यावर राज्य केले आहे. किल्ल्यात राजा बेनिसिंगसह अनेकांची समाधी आहे. झुडपी जंगलामुळे त्या झाकल्या आहेत. पुरातत्त्व विभागाच्यावतीने किल्ल्याचे ऐतिहासिक लिखाण करून फलक लावण्यात आले नसल्याने पर्यटकांना कुठल्याच प्रकारचा बोध होत नसल्याचे सत्य आहे.

ऐतिहासिक महत्त्वबाराव्या शतकात गवळीगड असलेल्या गाविलगड किल्ल्याची मुहूर्तमेढ इ.स. १४२५ मध्ये बहमनी शासक अहमदशहा वली यांनी रोवली. सर्वाधिक मोठ्या तोफा गाविलगड किल्ल्यात आहेत. २५ फूट लांब व ३२ टन वजनाच्या तोफा दुर्लक्षित आहेत. अनेक लहान तोफा बेपत्ता आहेत.  हैद्राबाद, अहमदनगर येथील पाथर्डी, माहूर व बैतूलच्या खेरला किल्ल्यावर नजर ठेवली जात होती.किल्ल्याच्या खालच्या भागात दारूगोळा बनवण्याचा कारखाना होता. किल्ल्याला मछली, वीरभान, शार्दुल व दिल्ली अशा दरवाजावर अत्यंत कोरीव व महत्त्वपूर्ण माहिती आहे. पुरातत्त्व विभागाचे यावर दुर्लक्ष आहे.किल्ल्यातील जुम्मा मशीद ही एकमेव वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर.

पाच वर्षांपासून डागडुजी, काम बंदपुरातत्त्व विभागाच्यावतीने पाच वर्षांपासून गाविलगड किल्ल्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यावर जवळपास दोन कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. पैकी एक कोटी रुपये खर्च झालेत. किल्ल्याच्या वास्तू वगळता वनजमिनीवरील कामाला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने ‘ब्रेक’ लावला आहे. झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप इतिहासतज्ज्ञांनी केला आहे.

इतिहासकालीन गाविलगड किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यातील वास्तू कोसळत आहेत. काम संथ गतीने सुरू आहे. किल्ल्याविषयीची ऐतिहासिक माहिती कुठेच लिहिण्यात आलेली नाही. पुरातत्त्व विभागाने योग्य दखल घेण्याची गरज आहे. अनिरुद्ध पाटील, इतिहासतज्ज्ञ 

गाविलगड किल्ल्याच्या कुठल्या कामाला बंद करण्याचे आदेश नाही. वनजमिनीवर विनापरवाना सुरू केलेले काम आवश्यक त्या परवानगी घेऊन करण्याचे आदेश दिले आहेत. - पीयूषा जगताप, उपवनसंरक्षक, मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा

पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांची कामे करण्यात आली.  त्यानंतर व्याघ्र प्रकल्पाच्या आदेशाने सहा महिन्यांपासून काम बंद आहे. दोन कोटींचा निधी शासनातर्फे मिळाला. पैकी एक कोटी रुपये खर्च झाले.मिलिंद अंगाईतकर, कंझर्व्हेशन अधिकारी, पुरातत्त्व विभाग

 

टॅग्स :ChikhaldaraचिखलदराFortगड