शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

बनावट कातडी प्रकरणाला वेगळे वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 22:45 IST

वाघाची बनावट आणि बिबट्याची कातडी पकडून स्वत:चे हसे करून घेतलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठांनी खोटे दस्तावेज बनविण्यासाठी दबाव आणल्यामुळे अमरावती वनविभाग विरूद्ध मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वरिष्ठ वनाधिकारी असे शीतयुद्ध रंगले आहे.

ठळक मुद्देएसीएफ, आरएफओ आक्रमक : क्षेत्र संचालकांविरुद्ध वनसचिवांकडे तक्रार

आॅनलाईन लोकमतअमरावती : वाघाची बनावट आणि बिबट्याची कातडी पकडून स्वत:चे हसे करून घेतलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठांनी खोटे दस्तावेज बनविण्यासाठी दबाव आणल्यामुळे अमरावती वनविभाग विरूद्ध मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वरिष्ठ वनाधिकारी असे शीतयुद्ध रंगले आहे. बनावट कातडीची लेखी तक्रार वनविभागाच्या प्रधान सचिवांकडे दस्तुरखुद्द वनाधिकाऱ्यांनीच केली आहे. त्यामुळे वनविभाग विरुद्ध व्याघ्र प्रकल्प हा वाद उफाळून आला आहे.राज्याचे वनसचिव विकास खारगे यांच्या नावे पाठविलेल्या तक्रारीत अमरावती वनविभागातील सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्राधिकारी यांनी सामूहिकपणे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांच्याविरूद्ध एल्गार पुकारला.विभागीय वनाधिकारी (व्याघ्र क्राइम सेल) विशाल माळी यांनी ४ फेब्रुवारी रोजी मध्यप्रदेशातून वाघ व बिबट्याची कातडी जप्त केली. यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, सदर कातडी ही बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यावर माळी यांनी सर्व प्रकरण अमरावती वनविभागावर लोटले. यातील एका आरोपीची मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला फरार दाखविण्याची किमया झाली. या प्रकरणाला ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर हे प्रकरण थंड करण्यासाठी २१ फेब्रुवारीला उपवनसंरक्षक मिणा हे तपास अधिकारी आर.जी. बोंडे व इतर वनाधिकाºयांना क्षेत्रसंचालक रेड्डी यांच्याकडे घेऊन गेले.

भ्रमणध्वनी रेकॉर्ड तपासावेपंचनामा बदलून आरोपी एकच दाखवा असे एम. एस. रेड्डी यांनी म्हटल्याचे तक्रारीत नमूद आहे. बनावट वाघ, बिबट कातडी पकडून नवख्या विभागीय वनाधिकाºयाने पाठ थोपटून घेण्याचा प्रकार झाला. मात्र, याप्रकरणी दोन आरोपी असताना पंचनामा बदलविण्यास दबाव आणल्याने व धमकी दिल्याने अमरावती वन विभागातील दोन सहायक वनसंरक्षक व अर्धा डझन वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी सही शिक्क्यानिशी वनसचिवांकडे लेखी तक्रार केली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अलीकडेच टुरिझमच्या नावाखाली झालेल्या सर्व कामांची चौकशी करावी, तसेच वनाधिकारी विशाल माळी हे गुन्ह्याच्या तपासापासून कोणत्या वरिष्ठांच्या संपर्कात होते, त्यांचे भ्रमणध्वनी रेकॉर्ड बाहेर काढावे आणि वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी अशी बनावट कारवाई करण्यास मुभा दिली का? हे चौकशीतून पुढे आणावे, असे लेखी तक्रारीत नमूद आहे.एनजीओमार्फत मध्यस्थी?बनावट कातडी प्रकरणात दुसऱ्या आरोपीला वाचविण्यासाठी सोबतच्या एन.जी.ओ.ने पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. दुसरीकडे अमरावती वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी खुली लेखी तक्रार क्षेत्रसंचालकांविरूद्ध करीत असताना उपवनसंरक्षक हेमंत मिणा हे वनविभागाच्या तपासकर्त्या वनाधिकाऱ्यांना सहकार्य करीत नसल्याची भावना अधिकाºयांमध्ये निर्माण झाली आहे. कारण रेड्डी यांनी सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे यांना डीएफओ मिणा यांच्यासमोरच बनावट कातडीच्या तपास प्रकरणाला कलाटणी देण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.क्राईम सेल अज्ञानी!मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने लाखो रुपये खर्चून क्राइम सेल गठित केले. अननुभवी वनाधिकाऱ्याची नियुक्ती केली. सोबतीला मानधनावर काही एन.जी.ओ. दिले. मात्र, पोलीस खात्याच्या तुलनेत ‘व्याघ्र क्राइम सेल’ अज्ञानी आहे. बनावट कातडीची ओळख नसलेल्या वनाधिकाºयांचा यात हशा उडाला आहे. त्यात आरोपी दोन असताना एकालाच आरोपी करण्याची धडपड सुरू झाली आहे.बिबट, वाघ कातडी जप्तीप्रकरणी पंचनामा योग्य नाही. मारेकरी समोर यायला हवे. यात चौकशी अधिकारी चौकशी करण्यास असमर्थ असल्यास त्यांनी तसे लेखी द्यावे. याप्रकरणी कुणावरही दबाव आणलेला नसून, वैयक्तिक संपत्तीच्या चौकशीचे आरोप तथ्यहीन आहेत.- एम.एस. रेड्डीक्षेत्रसंचालक, मेळघाट