शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फी भरण्यासाठी पैसे नसल्यानं शेतक-याच्या मुलीची आत्महत्या, अमरावतीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 15:31 IST

बीडमध्ये बी.कॉम.द्वितीय वर्षाच्या प्रवेशाची मुदत संपत आली असताना केवळे पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याने नैराश्यातून तारखडे येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.

तिवसा (अमरावती), दि. 24 -  फी भरण्यासाठी पैसे नसल्यानं शेतकरी कुटुंबातील एका मुलीनं स्वतःचं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. बी.कॉम.द्वितीय वर्षाच्या प्रवेशाची मुदत संपत आली असताना केवळे पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याने नैराश्यातून तारखडे येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. पुरेसं आर्थिक पाठबळ नसल्याने घरातून प्रवेशाचे 1 हजार रूपये मिळण्यास विलंब होत होता यामुळे विद्यार्थिनीनं विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नजीकच्या तारखेड येथे घडली.मिनल डाहे (१८ वर्षे) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिनलच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिच्या कुटुंबाकडे अवघी दोन एकर शेती आहे. त्यात मोठी बहीण आणि लहान भाऊ शिक्षण घेत आहेत. तरीही शिक्षणाची प्रचंड आवड असलेल्या मिनलने विपरीत परिस्थितीतही बी.कॉम. भाग-1 ची परीक्षा उत्तीर्ण केली. ती येथील यादव देशमुख महाविद्यालयात शिकत होती. याच महाविद्यालयात बी.कॉम.द्वितीय वर्षाला तिला प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी महाविद्यालयात नियमामुसार १ हजार रूपयांची प्रवेश शुल्क भरायचे होते. मिनलने घरी पैशांची मागणी केली होती. मात्र, यंदा पीक-पाण्याची स्थिती अत्यंत वाईट असल्याने संकटग्रस्त असलेल्या मिनलच्या पालकांनी तिला दोन दिवस थांबण्यास सांगितले. मात्र, प्रवेशाची मदत संपत आल्याने पैशांअभावी आपला द्वितीय वर्षात प्रवेश होईल की नाही, ही चिंता मिनलला सतावत होती.एकीकडे कुटुंबाची दैनावस्था व दुसरीकडे शिक्षणाची ओढ या द्विधा मानसिकतेत अडकलेल्या मिनलने हा ताण सहन न होऊन टोकाचा निर्णय घेतला. घरातील सर्व सदस्य शेतात गेले असताना तिने किटकनाशक प्राशन केले व इहलोकाची यात्रा संपविली. कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी लगोलग गंभीर अवस्थेत मिनलला आधी ग्रामिण रूग्णालयात व नंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. तिवसा पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला आहे. शिक्षण घेऊन समाजसेवा करण्याचे मिनलचे स्वप्न होते. मात्र, अवघ्या १ हजारांपायी तिचे हे स्वप्न बेचिराख झाल्याची खेदजनक भावना तिच्या शोकाकुल कुटुंबीयांनी व्यक्त केली.

टॅग्स :Suicideआत्महत्या