शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

तंबाखूजन्य पदार्थांबाबत व्हावी व्यापक जनजागृती

By admin | Updated: May 31, 2015 00:03 IST

गुटका, तंबाखू खाणे, बीडी, सिगारेट ओढणे हे आरोग्यास अतिशय हानीकारक आहे.

जागतिक तंबाखूविरोधी दिन : जगात दरवर्षी ३० लाख नागरिकांचा होतो मृत्यूतळेगाव दशासर : गुटका, तंबाखू खाणे, बीडी, सिगारेट ओढणे हे आरोग्यास अतिशय हानीकारक आहे. तंबाखू वापराच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करून या व्यसनापासून लोकांना, शाळा-महाविद्यालयातील तरूण-तरूणींना परावृत्त करणे हा या ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. तंबाखूचा उपयोग आज जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेला आहे. याला तंबाखू उद्रेक म्हणजे वावगे ठरणार नाही. इतर आजाराच्या उद्रेकाचे मूळ कारण हे सामान्यपणे एखादा जीवाणू किंवा विषाणू असे असते. परंतु तंबाखू उद्रेकाचे कारण जिवाणू किंवा नैसर्गिक आपत्तीपैकी काही नसून ते मानव निर्मित आहे. नफ्याच्या शोधात असलेल्या तंबाखुजन्य उत्पादन निर्मितीच्या कंपन्या त्यांचे ग्राहक क्षेत्र वाढविण्याच्या प्रयत्नात असतात. परंपरागत ग्राहकासोबतच तरूण पिढीला चटक लावतात आणि स्त्रियांनी सांस्कृतिक गुलामगिरी झुगारून धुम्रपानास उद्युक्त व्हावे अशा प्रकारच्या भावनात्मक जाहीरातबाजीने स्वत:च्या फायद्यासाठी त्यांना खोटी प्रलोभने दाखवून आकर्षित करतात. इतर साथरोगाप्रमाणे हा उद्रेक नव्हे तर धुम्रपान किंवा तंबाखू सेवन करण्यास लोकांनी सुरुवात केल्यानंतर प्रदीर्घ काळांनी दिसणारी ती एक प्रतिक्रिया असते. अंदाजे ३० ते ४० वर्षानंतर त्याचे दुष्परिणाम मृत्यूच्या स्वरुपात दिसू लागतात. आज जगामध्ये प्रत्येक वर्षी ३० लाख मृत्यू हे तंबाखुजन्य पदार्थाच्या उपयोगाने होतात, यामुळे कोट्यवधी लोक बळी ठरतील, ठरू शकतात.१९४० ते १९५० या दशकात धुम्रपानाने थैमान घातले होते. त्याचे परिणाम आज दिसू लागले आहेत. विकसीत देशात आढळणाऱ्या वर्षातील एकूण मृत्यूपैकी २० टक्के मृत्यू हे तंबाखूच्या वापरामुळे झालेले आज आढळत आहेत. आपण याला नियंत्रित करू शकलो नाही तर हे प्रकरण ३० ते ४० वर्षात एक कोटीवर जाईल की ज्यावेळी धुम्रपान करणारे सध्याचे तरूण हे मध्यमवयात असतील आणि त्यापैकी ७० टक्के मृत्यू विकसनशील राष्ट्रातील असतील म्हणून चालू दशकात यासंबंधी गंभीरपणे प्रतिबंधक उपाय योजले नाही तर अनेक लोक निष्कारण मरतील. संशोधकांनी क्रमवारी ठरविल्याप्रमाणे असे सिद्ध होते की, तंबाखुमधील निकोटीन हे हिराईन कोकेन, मॅरिज्युआना किंवा अल्कोहोल यापेक्षाही हानीकारक आहे. तरी सुद्धा तंबाखू उत्पादक कंपन्यांनी तंबाखूची उत्पादने भारी प्रमाणात बाजारात आणणे चालूच ठेवले आहे. परिणामी जागतिक तंबाखू सेवन हे दुप्पट झाले आहे आणि हे प्रमाण जगाच्या काही भागात वाढतच आहे. सेवन करण्याची सुरक्षित अशी पातळी तंबाखू निर्मित उत्पादकांना नाही आणि हेच एक वैधानिक असे ग्राहकोपयोगी उत्पादन आहे की जे उत्पाकांच्या अपेक्षेप्रमाणे उपयोग करून ग्राहकाला ठार मारते. अनेक राष्ट्रात स्त्रियांमधील धुम्रपानाचे प्रमाण वाढतच आहे, ग्राहकांना परवडेल अशी कमी किंमत व जाहीरातबाजीद्वारे तंबाखू कंपन्यांनी तरूण पिढीला प्रोत्साहीत करण्यात यश मिळविले आहे. या वयातील मुले-मुली धुम्रपानाच्या दूरगामी परिणामाबद्दल बेफिकीर असतात म्हणून धुम्रपानाच्या दूरगामी दुष्परिणामास सुरुवात होते. जागतिक आरोग्य संघटनेचे असे अनुमान आहे की आज जगात ११० कोटी लोक धुम्रपानाच्या आहारी गेलेले आहेत.