शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

राज्यात कारागृहांत २५८५ अस्थायी पदांना मुदतवाढ; अपर पोलीस महासंचालक ते शिपाई पदांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 17:28 IST

राज्यात मध्यवर्ती, जिल्हा कारागृह, विशेष, महिला आणि खुले कारागृहात अस्थायी असलेल्या २५८५ पदांना शासनाने मुदतवाढ प्रदान केली आहे. यात अपर पोलीस महासंचालक ते शिपाई पदांचा समावेश असून, यापैकी ८७ राजपत्रित, तर २४९८ अराजपत्रित आहे. त्यानुसार गृहविभागाने ३१ जानेवारी रोजी आदेश निर्गमित केले आहे.

अमरावती : राज्यात मध्यवर्ती, जिल्हा कारागृह, विशेष, महिला आणि खुले कारागृहात अस्थायी असलेल्या २५८५ पदांना शासनाने मुदतवाढ प्रदान केली आहे. यात अपर पोलीस महासंचालक ते शिपाई पदांचा समावेश असून, यापैकी ८७ राजपत्रित, तर २४९८ अराजपत्रित आहे. त्यानुसार गृहविभागाने ३१ जानेवारी रोजी आदेश निर्गमित केले आहे.कारागृह विभागातील महानिरीक्षक कार्यालय ते त्यांच्या अधिपत्याखाली कारागृहातील मंजूर पदांचा सर्वंकष आढावा पूर्ण होऊन उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने ४२१६ पदांच्या सुधारित आकृतिबंधास शासननिर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे. ४२१६ पदांच्या या आकृतिबंधात ४ डिसेंबर २०१७ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे एकू ण १७३७ पदे अस्थायी निर्माण करण्यात आली आहेत. त्यानंतर सातत्याने अस्थायी पदे वाढतच गेली. त्यामुळे गृहविभागाने २५८५ अस्थायी पदांना १ जानेवारी २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत पुढे चालू ठेवण्यास मान्यता प्रदान केली आहे. या पदांसाठी लागणारा खर्च शासनाकडून मिळेल, असे गृहविभागाचे कार्यासन अधिकारी स.ग. ठेंगील यांनी स्पष्ट केले आहे.

कारागृहनिहाय पदांना मुदतवाढपुणे कारागृह महानिरीक्षक कार्यालय - ३८, कारागृह उपमहानिरीक्षणालय येरवडा- ७, दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण येरवडा- १५, येरवडा मध्यवर्ती कारागृह - १६४, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह - ६७, सातारा जिल्हा कारागृह - ४६, सांगली जिल्हा कारागृह - ३८, सोलापूर जिल्हा कारागृह - ४९, कोल्हापूर जिल्हा कारागृह - १४, अहमदनगर जिल्हा कारागृह - ३३, विसापूर जिल्हा कारागृह - १६, खुले कारागृह येरवडा पुणे - १९, स्वतंत्रपूर खुली वसाहत आटपाडी - १३, कारागृह उपमहानिरिक्षक भायखळा मुंबई - १६, मध्यवर्ती कारागृह मुंबई - १०९, ठाणे मध्यवर्ती कारागृह - १०९, तळोजा मध्यवर्ती कारागृह नवी मुंबई - ३१२, कल्याण जिल्हा कारागृह - ८३, भायखळा जिल्हा कारागृह - २८, रत्नागिरी विशेष कारागृह - १२, अलिबाग जिल्हा कारागृह - ३२, सावंतवाडी जिल्हा कारागृह - ८, मुंबई जिल्हा महिला कारागृह - २७, जे.जे. समूह रुग्णालय मुंबई - १७, कारागृह उपमहानिरीक्षक औरंगाबाद - ११, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह - ८५, औरंगबाद मध्यवर्ती कारागृह - ८३, उस्मानाबाद जिल्हा कारागृह - ३२, नांदेड जिल्हा कारागृह - ३२, धुळे जिल्हा कारागृह - १९, बीड जिल्हा कारागृह - ३५, परभणी जिल्हा कारागृह - १, जळगाव जिल्हा कारागृह - ३८, किशोर सुधारालय नाशिक - ३१, पैठण खुले कारागृह - ४१, कारागृह उपमहानिरीक्षक नागपूर - ११, नागपूर मध्यवर्ती कारागृह - ८४, अमरावती मध्यवर्ती कारागृह - ८०, अकोला जिल्हा कारागृह - ३५, यवतमाळ जिल्हा कारागृह - ४०, चंद्रपूर जिल्हा कारागृह - ६१, वर्धा जिल्हा कारागृह - ३६, बुलडाणा जिल्हा कारागृह - ३३,  भंडारा जिल्हा कारागृह - ४१, खुले कारागृह मोर्शी - ५१, लातूर जिल्हा कारागृह - ९८, वाशिम जिल्हा कारागृह - ६०, नंदुरबार जिल्हा कारागृह - ७५, जालना जिल्हा कारागृह - ७५, गडचिरोली जिल्हा कारागृह - ५२ व सिंधदुर्ग जिल्हा कारागृह - ३७ अशा २५८५ पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

टॅग्स :Policeपोलिसjailतुरुंग