‘पदव्युत्तर प्रवेशाला मुदतवाढ द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:13 IST2020-12-24T04:13:58+5:302020-12-24T04:13:58+5:30

अमरावती : सत्र २०२०-२१ मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या परीक्षांमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाकडून रोखण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ...

‘Extend Postgraduate Admission’ | ‘पदव्युत्तर प्रवेशाला मुदतवाढ द्या’

‘पदव्युत्तर प्रवेशाला मुदतवाढ द्या’

अमरावती : सत्र २०२०-२१ मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या परीक्षांमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाकडून रोखण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अजूनही गुणपत्रिका प्राप्त झालेल्या नाही. परिणामी विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणापासुन वंचित राहू शकतात. अशा वेळी शैक्षणिक भवितव्य लक्षात घेऊन पदव्युत्तर प्रवेशाची अंतिम तारीख वाढविण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून ३१ डिसेंबर ही अंतिम तारीख घोषित करण्यात आली आहे. परंतु, बऱ्याच विद्यार्थ्यांचा निकाल ‘विथहेल्ड’ आहे. यामुळे विद्यापीठाची प्रवेश निश्चितीची मुदत १५ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी राज्य उपाध्यक्ष हिमांशू अतकरे, जिल्हाध्यक्ष धीरज बनकर, जिल्हा सचिव योगेश चव्हाण, अंकित इंगळे, सागर कोल्हे, कार्तिक पुरी यांनी कुलगुरूंकडे केली.

Web Title: ‘Extend Postgraduate Admission’