शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

श्रीक्षेत्र सालबर्डीत हातभट्टीसह विदेशी दारूविक्रीला उधाण

By admin | Updated: August 24, 2015 00:30 IST

मध्य प्रदेश क्षेत्रातील सालबर्डी येथे हातभट्टीसोबतच विदेशी दारुची विक्री राजरोसपणे सुरु असल्याने श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलिसांचे विक्रेत्यांना अभय : महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐेरणीवररोहितप्रसाद तिवारी मोर्शीमध्य प्रदेश क्षेत्रातील सालबर्डी येथे हातभट्टीसोबतच विदेशी दारुची विक्री राजरोसपणे सुरु असल्याने श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथून आठ किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील सालबर्डी येथे सध्या सुरु असलेल्या श्रावण महिन्यात विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून महिला-पुरुषभक्त मंडळी दर्शनाकरिता येतात. सातपुडा पर्वतातील महादेवाची गुहा ही मध्य प्रदेश राज्याच्या सीमेत येते. पर्वतावर चढण्यापूर्वी पहिली पायरी म्हणून ओळखली जाणाऱ्या परिसरात पूजेच्या साहित्यासोबतच चहा-फराळाची दुकाने थाटण्यात आलेली आहेत. या सर्वच टपऱ्या आणि दुकानांतून सर्रास विदेशीसह हातभट्टीच्या दारुची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. याशिवाय भुयारी मार्गावरील लहान पुलाच्या पुढे आणि साधारणत: एक किमी अंतरावरील नदी किनारी एका झाडाच्या आडोशाने उभारलेल्या टपरीतही अशीच दारु मद्यपींना उपलब्ध करुन दिली जात आहे. श्रावण महिन्यातच नव्हे, तर एरवी संपूर्ण बाराही महिने श्रध्दाळू पर्यटक आणि महाविद्यालयीन, शाळकरी विद्यार्थी सालबर्डीला येतात, भुयारातील महादेवाच्या पिंडीचे दर्शनही घेतात. त्यात महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते; तथापि येथे खुलेआम मिळणाऱ्या दारुमुळे मद्यपींचा त्रास या पर्यटकांना आणि भक्तांना सहन करावा लागतो. त्यातून अप्रिय घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. संपूर्ण परिसर मध्य प्रदेश क्षेत्राच्या आठनेर पोलीस ठाण्यात येतो. सालबर्डीपासून आठनेर पोलीस ठाणे कित्येक किमी दूरवर असल्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवसांत येथे भरत असलेल्या यात्रेत दारूचा महापूर वाहतो. मात्र पोलीस प्रशासनाचे सालबर्डी आणि तेथील अवैध धंद्याकडे दुर्लक्ष असते. त्यामुळे भीतीयुक्त वातावरणात भाविक तथा पर्यटकांना यात्रा करावी लागते. पर्यटक आणि भक्तांच्या सुरक्षिततेकरिता या परिसरात विकली जाणाऱ्या अवैध देशी-विदेशी दारुविक्रेत्यांवर कठोर कारवाई दोन्ही राज्यातील पोलिसांनी संयुक्तरीत्या करावी, अशी मागणी पर्यटकांनी केली जात आहे. संयुक्त कारवाई केवळ कागदोपत्रीचमहाशिवरात्रीच्या यात्रेपूर्वी दोन्ही राज्याच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक दरवर्षी होते.त्यात अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यासाठी संयुक्त कारवाई करण्याचे ठरविण्यात येते. मात्र ही कारवाई फक्त यात्रा कालावधीतच पाहावयास मिळते, त्यानंतर परिस्थिती जैसे थे राहत असल्याचे दिसून येते.