शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
4
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
5
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
6
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
7
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
8
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
9
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
10
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
11
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
12
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
13
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
14
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
15
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
16
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
17
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
18
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
19
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
20
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीच्या पहिल्यांदाच २८०९ केंद्रांवर परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल आणि ...

ठळक मुद्देप्रवेशित शाळा, महाविद्यालये केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल आणि बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिलपासून होऊ घातली आहे. कोरोना संसर्गाच्या विळख्यामुळे प्रवेशित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयेच परीक्षा केंद्रे राहतील, असा निर्णय झाला आहे. यामुळे अमरावती विभागात पहिल्यांदाच तब्बल २८०९ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. विभागीय शिक्षण मंडळाने अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या पाचही जिल्ह्यांमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे. शिक्षण मंडळाने कोविड-१९ च्या अनुषंगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे परीक्षा केंद्रांवर पालन होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. नियमित विद्यार्थ्यांना परीक्षेत अर्धा तास व अपंग विद्यार्थ्यांना एक तास अधिक वेळ देण्यात येणार आहे.विभागात दहावीच्या एकूण २६४२ शाळांची नोंद आहे. गतवर्षी दहावीच्या परीक्षेसाठी ७१६ केंद्रे होती. मात्र, यंदा २५१० परीक्षा केंद्रे असतील. १३२ शाळांना डच्चू देण्यात आला आहे.बारावीसाठी एकूण १५७७ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यापैकी १५१९ परीक्षा केंद्रे राहतील. ५८ कनिष्ठ महाविद्यालयांना वंचित ठेवण्यात आले आहे. गतवर्षी ५०४ केंद्रे होती. यंदा १०१५ परीक्षा केंद्रे वाढली आहेत. 

राज्य शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षांचे नियोजन सुरू आहे. दहावीसाठी १७९४, तर बारावी परीक्षेसाठी १०१५ केंद्रे वाढली आहेत. काही अपवाद वगळता विद्यार्थ्यांना त्याच शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. - शरद गोसावी, विभागीय अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ.

 

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा