शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

चिखलदऱ्यात दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:38 IST

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर १ मार्चपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे पाणीटंचाई पाहता पर्यटकांनी या एकमेव पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांमध्ये पाणीटंचाईविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देविदर्भाच्या नंदनवनात पाणी पेटले : पर्यटकांनी फिरविली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर १ मार्चपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे पाणीटंचाई पाहता पर्यटकांनी या एकमेव पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांमध्ये पाणीटंचाईविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.सिडकोनंतर कोट्यवधीच्या विकासकामाचा कांगावा केला जात असला तरी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य बारा वर्षांपासून पाचवीला पुजलेले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शेकडो आराखडे कागदावरच आखण्यात आले. चिखलदरा शहर विकास प्राधिकरण अंतर्गत तयार बागलिंगा प्रकल्पाची उभारणी भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी असताना प्रत्यक्षात बारा वर्षांपासून चिखलदरावासीयांची फरफट थांबलेली नाही. पाण्याअभावी पर्यटकांनीसुद्धा सुविधा मिळत नसल्याने उन्हाळ्याच्या सुट्टीतला आखलेला बेत रद्द केला आहे.टँकरने विकतचे पाणीपर्यटनस्थळावरील हॉटेल व्यावसायिकांना प्रतिटँकर सहाशे रुपये दराने पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे वास्तव आहे. सहा लाख लिटर दररोज हवे असताना दिवसाआड साडेचार लाख लिटर पाणी नळावाटे सोडले जात आहे.आठशे ग्राहक अन् तलाव कोरडेचिखलदरा शहराला जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. चिखलदºयात केवळ ८६९ ग्राहक आहेत. त्यांना दररोज सहा लक्ष लिटर पाणी आवश्यक आहे. शहरातील शक्कर तलाव आटला. कालापाणी तलावात मोजकाच जलसाठा उपलब्ध आहे. शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील आमझरी गावातून चिखलदरा शहराची तहान भागविली जात आहे. शक्कर तलाव इंग्रजकालीन असला तरी १२ वर्षांपूर्वी खोदकामासोबत भूसुरुंग (ब्लास्टिंग) केल्याने खोलपर्यंत भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यातच तलावातील पाणी वाहून जाते. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे स्वारस्य कुणीही दाखविले नाही.पाण्याऐवजी घोषणांचा पाऊसचिखलदरा शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. त्यालगत चंद्रभागा, सपन, शहानूर आदी प्रकल्पासह इतर लहान-मोठे तलाव आहेत. प्रत्यक्षात दरवर्षी उन्हाळा येताच पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो. तरीसुद्धा स्थानिक प्रशासनासह कोणीच गंभीर नसल्याचे दुर्दैवी चित्र नागरिकांसह पर्यटकांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई