शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

अखेर जिल्हा दुष्काळग्रस्त

By admin | Updated: January 1, 2016 00:37 IST

यंदाच्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ४३ पैसे गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. १ हजार ९६७ गावांत ५० पैशांच्या आत

गजानन मोहोड ल्ल अमरावतीयंदाच्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ४३ पैसे गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. १ हजार ९६७ गावांत ५० पैशांच्या आत पैसेवारी असल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त असण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले. याविषयी शासनाच्या घोषणेची औपचारिकता बाकी राहिली आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व गावांना शासनाच्या सोई-सवलती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.यंदाच्या खरीप हंगामात पेरणीपासून पावसांची दडी, व नंतर पावसात खंड यामुळे जिल्ह्यातील ३ लाख १९ हजार ९९५ हेक्टरमधील सोयाबीन उद्ध्वस्त झाले. क्विंटल ऐवजी किलोमध्ये उतारी आली. शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत असताना शासनाने १६ सप्टेंबरच्या आदेशान्वये ६५ पैशांपेक्षा कमी व अधिक या निकषा नुसार जिल्ह्यात ५९ पैसे ही पैसेवारी १८ सप्टेंबरला घोषित केली होती. ही दुष्काळजन्य स्थिती गृहीत धरण्यात आली. मात्र एकाच आठवड्यात शासनाने निर्णय फिरविला. २३ सप्टेंबरला सुधारित निकष मागे घेऊन प्रचलीत ५० पैशांपेक्षा कमी किंवा अधिक अशी पैसेवारी घोषित करण्याचा निर्णय घेतला. यानंतर जिल्ह्यात खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ३२ आॅक्टोबरला ४६ पैसे जाहीर करण्यात आली. यामध्ये अमरावती तालुका ३७ पैसे, भातकुली ४४, नांदगाव खंडेश्वर ४९, चांदूररेल्वे ४५, धामणगाव ४७, तिवसा ४३, मोर्शी ४८, वरुड ४९, अचलपूर ४७, चांदूरबाजार ४७, दर्यापूर ४८, अंजनगाव ४७, धारणी ४२ व चिखलदरा तालुक्यात ४५ पैसे ही पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान ३ आॅक्टोबर रोजी शासनाने पैसेवारी काढण्याविषयी सर्वसमावेशक निर्णय घेतला. त्या अनुषंगाने यंदाच्या खरीप पिकांची अंतिम पैसेवारी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. ही ५० पैशांच्या आत असल्याने जिल्ह्यात दुष्काळस्थिती असल्याविषयी शिक्कामोर्तब झाले आहे.या सवलती मिळणार ४जमीन महसुलात सूट४सहकारी कर्जाचे पुर्नगठन४शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती४कृषी पंपाच्या चालू बिलात ३३.५ टक्के इतकी सूट४शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी४रोहयोअंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता ४आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर४शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.शासनाने यापूर्वी जाहीर केलेले दुष्काळग्रस्त जिल्हे हे कमी पाऊस या निकषावर आधारित होते. त्या तुलनेत जिल्ह्यात पाऊस ८० ते ९० टक्के होता. मात्र खरीप पिकांची सुधारित आणि अतिम पैसेवारी ही ५० पैशाच्या आत आल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासन लवकरच निर्णय घेणार आहे. - किरण गित्ते, जिल्हाधिकारी.महसूलमंत्र्यांना कधी येणार जाग ? ४राज्यातील दुष्काळग्रस्त काही जिल्ह्यांची यादी आॅक्टोबर अखेरीस महसूल मंत्र्यांनी जाहीर केली होती. तसेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ना. एकनाथ खडसे यांनी राज्यातील उर्वरित काही दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची यादी घोषित करण्यात येईल, अशी घोषणा अकोला येथे माध्यमांशी बोलताना केली होती. मात्र डिसेंबरअखेर झाला असतानाही महसूल मंत्र्यांनी याविषयी घोषणा केलेली नाही. आता जिल्ह्यासह विभागातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्याने महसूलमंत्री जिल्हा दुष्काळाची केव्हा घोषणा करणार, असा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे.