शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीतील सत्तेचे समीकरण बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 06:00 IST

जिल्हा परिषदेतून काहींचा पुढील राजकीय मार्ग प्रशस्त झाला. आताच्या विधानसभा निवडणुकीतही अनेक सदस्यांनी निवडणुकीची तयारी करून निवडणूक रिंगणातही उतरले होते. यात जिल्हा परिषदेतील सत्ताधारी काँग्रेसचे गटनेता तथा जिल्हा ग्रामीण कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आरोग्य व वित्त समितीचे सभापती बळवंत वानखडे, सदस्य देवेंद्र भुयार यांचा समावेश होता.

ठळक मुद्देदोन जागा रिक्त : अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली आहेत. यामुळे आगामी काळात जिल्हा परिषदेची राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून, दोन महिन्यांनी होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापती पदांच्या निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्हा परिषदेच्या दोन सदस्य विधानसभेची पायरी चढले आहेत. त्यामुळे या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. परिणामी रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीनंतर ‘मिनी मंत्रालया’त राजकीय समीकरणांमध्ये आणखी बदल अपेक्षित आहेत.जिल्हा परिषदेतून काहींचा पुढील राजकीय मार्ग प्रशस्त झाला. आताच्या विधानसभा निवडणुकीतही अनेक सदस्यांनी निवडणुकीची तयारी करून निवडणूक रिंगणातही उतरले होते. यात जिल्हा परिषदेतील सत्ताधारी काँग्रेसचे गटनेता तथा जिल्हा ग्रामीण कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आरोग्य व वित्त समितीचे सभापती बळवंत वानखडे, सदस्य देवेंद्र भुयार यांचा समावेश होता. निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या या विद्यमान तीन पदाधिकाऱ्यांपैकी आरोग्य व वित्त सभापती बळवंत वानखडे यांनी दर्यापूर मतदारसंघातून विजय मिळविला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य देवेंद्र भुयार यांनी मोर्शी मतदारसंघातून विजय मिळविला, तर अचलपूर मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे विद्यमान काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. परिणामी जिल्हा परिषदेतील दोन सदस्य थेट विधानसभेत पोहोचल्यामुळे त्यांच्या दोन जागा रिक्त झालेल्या आहेत. परिणामी या दोन जागांसाठी पोटनिवडणूका होणार आहेत. अशातच विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्याचे सभापती आदीचा अडीच वर्षांचा कार्यकाळ २० सप्टेंबर रोजी संपला आहे. परंतु, विधानसभेच्या निवडणुकीमुळे जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाºयांना चार महिन्यांची मुदतवाढ शासनाने दिली होती. परिणामी येत्या जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेत पुढील अडीच वर्षांसाठी नवीन पदाधिकाºयांची निवड होणार आहे.सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या आघाडीची सत्ता आहे. पक्षीय बलाबलानुसार काँग्रेसकडे जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य आहे. दोघे जण विधानसभेत पोहोचल्यामुळे जिल्हा परिषद सभागृहातील सदस्य संख्या दोनने घटली आहे. ५९ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी ३० सदस्यांची गरज आहे. परंतु, सदस्य संख्या जुळवितांना सत्ताधारी पक्षाला मोठी कसरत करावी लागणार आहे. अशातच काँग्रेसकडील सत्ता आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपनेही राजकीय गणिते मांडणे सुरू केली आहेत. पुरेसे संख्याबळ जुळवून काँग्रेसची सत्ता आपल्याकडे खेचून आण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेसने कुठल्याही परिस्थितीत सत्ता टिकवून ठेवण्यासाठी राजकीय खेळी आखणे सुरू केले आहे.विद्यमान राजकीय परिस्थिती लक्षात घेता, काँग्रेसची सत्ता कायम राहणार की विरोधकांकडे जाणार, याबाबतचे खरे चित्र अद्याप अस्पष्ट असले तरी ते निवड प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच दिसून येणार आहे. सध्या सदस्यसंख्या दोनने घटल्यामुळे आवश्यक संख्याबळ जुळविण्यासाठी लॉबिंग सुरू आहे.बंडखोरीची शक्यताजिल्हा परिषदेत नवे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती यांच्या निवडणुकीदरम्यान सत्ताधारी व विरोधक यांचे फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, असंतुष्टाची नाराजी दूर करण्यासोबतच पुरेसे संख्याबळ जुळविताना सदस्य पळविण्याचे राजकारण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

टॅग्स :zpजिल्हा परिषद