शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
3
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
5
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
6
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
7
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
8
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
9
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
10
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
11
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
12
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
13
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
14
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
15
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
16
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
17
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
18
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
19
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बियाण्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास; आठ कंपन्या एसआयटीचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 14:41 IST

बीटी बियाण्यांमध्ये विनापरवानगी तणनाशकाला सहनशील करणाऱ्या जनुकांचा वापर करणाऱ्या आठ बियाणे कंपन्या विशेष तपास (एसआयटी) पथकाचे लक्ष्य राहणार आहे. या कंपन्यांविरोधात पाराशिवणी येथे गुन्हा दाखल आहे.

ठळक मुद्देअवैध उत्पादनविक्री करणाऱ्या अनेक राज्यांमध्ये टोळ्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बीटी बियाण्यांमध्ये विनापरवानगी तणनाशकाला सहनशील करणाऱ्या जनुकांचा वापर करणाऱ्या आठ बियाणे कंपन्या विशेष तपास (एसआयटी) पथकाचे लक्ष्य राहणार आहे. या कंपन्यांविरोधात पाराशिवणी येथे गुन्हा दाखल आहे. त्या कागदपत्रांची छाननी करून शासनाला अहवाल सादर होणार आहे. या बियाण्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. अशाप्रकारे बियाण्यांची विक्री करणाऱ्या टोळ्या अनेक राज्यांमध्ये कार्यरत असल्याचा शासनाचा अंदाज आहे. त्या दृष्टीेनेदेखील एसआयटी तपास करणार आहे.बीटी कापसाच्या बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील असलेले जनुक वापरून अवैध विक्री होत असल्याची बाब शासनाच्या निर्दशनात आली. एखाद्या बियाणे कंपनीला केंद्र शासनाने बियाणे अधिनियम १९६६ च्या तरतुदीअंतर्गत अधिसूचित असलेले अथवा नसलेले, परंतु संशोधित जनुक परिवर्तित वाण व्यापारी तत्त्वावर उत्पादित करावयाचे असल्यास, प्रचलित कार्यपद्धतीनुसार अशा कंपनीला जेनेटिक इंजिनीअरिंग अपरायझल कमिटीकडून परवानगी आवश्यक आहे. त्यानंतरच महाराष्ट्रात सदर वाण विकण्यासाठी कृषी आयुक्तालयाकडून परवानगीची कार्यवाही करण्यात येते.राज्यात सद्यस्थितीत बीटी कापूस बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील असलेले जनुक असलेल्या बियाणे विक्रीला कमिटीने मान्यता दिलेली नाही. मात्र, अशा प्रकारचे उत्पादन अनेक कंपन्यांद्वारा राज्यासह देशभरात सुरू आहे. या बियाण्यांची अवैध विक्री, साठवणूक सुरू असून, अशा प्रकारचा अपराध करणाºया टोळ्या अनेक राज्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याने आता शासनाद्वारा या कंपन्यांच्या मुसक्या आवळण्यात येणार आहेत. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठीच एसआयटीचा उतारा शासनाने शोधला आहे. या कमिटीच्या शिफारशींवरून आता कारवाई होणार आहे.एकाही बियाणे कंपनीला परवानगी नाहीजनुक परिवर्तित पिकांच्या चाचण्या घेण्यास बियाणे कंपन्यांनी परवानगी मागितल्यामुळे शासनाने १० सदस्यीय राज्य सल्लागार समिती स्थापित केली. देशात सध्या जनुक परिवर्तित पीक म्हणून सन २००२ मध्ये बीजी-१ व सन २००६ मध्ये बीजी-२ या बीटी कपाशीच्या वाणाला राज्यात बियाणे विक्रीला परवानगी आहे. मात्र, केंद्र शासनाने बियाणे अधिनियम १९६६ अन्वये जनुक परिवर्तित वाण उत्पादित करण्याची व विकण्याची परवानगी समितीने एकाही कंपनीला दिलेली नसताना काही बियाणे कंपन्यांनी महाराष्ट्रसह अन्य राज्यातदेखील अवैधपणे बियाणे विक्रीचा गोरखधंदा सुरू केल्याने पर्यावरणाचीही हानी होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस