शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

‘लॉकडाऊन’ झुगारून बडनेऱ्यात ‘एंट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST

खासगी वाहनांनी मोठ्या संख्येने लोक गावाकडे परत येत आहेत. लॉकडाऊनला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. शासनाने आहे तिथेच थांबा, घराबाहेर पडू नका, अशा सूचना दिल्यावरही मोठ्या संख्येत लोक पळवाटा शोधत आहेत. अशाच प्रकारे २७ मार्च रोजी १३ जण मुंबईतून बडनेºयात आले. मोदी दवाखान्यात या सर्वांची थर्मल स्क्रीनिंग झाल्यावर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले.

ठळक मुद्देशहर धास्तावले : मुंबईतून १३ जण आले

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : ‘लॉकडाऊन’ झुगारून मुंबईतून खासगी वाहनाने १३ व्यक्ती बडनेºयात आल्याने शहरात भीतीचे वातावरण तयार झाले. या सर्वांचे थर्मल स्क्रीनिंग मोदी दवाखान्यात करण्यात आले. एंट्री चेक पॉइंटला आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे, अन्यथा जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना ही झुंबड अपयशी ठरवेल, असे चित्र आहे.खासगी वाहनांनी मोठ्या संख्येने लोक गावाकडे परत येत आहेत. लॉकडाऊनला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. शासनाने आहे तिथेच थांबा, घराबाहेर पडू नका, अशा सूचना दिल्यावरही मोठ्या संख्येत लोक पळवाटा शोधत आहेत. अशाच प्रकारे २७ मार्च रोजी १३ जण मुंबईतून बडनेऱ्यात आले. मोदी दवाखान्यात या सर्वांची थर्मल स्क्रीनिंग झाल्यावर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले. एका नगरसेवकाने या सर्वांच्या पाठीशी राहून बरीच धावपळ केली. त्यांच्या घरीच तपासणी करा, असा आग्रहदेखील या नगरसेवकाने प्रशासनाकडे केला होता. मात्र, शहरासाठी ही सहृदयता किती धोकादायक ठरू शकते, याचादेखील विचार झाला पाहिजे, अशी जनभावना याप्रकरणी व्यक्त होत आहे.बडनेºयात वैद्यकीय विभागाची काळजी लोंढ्यामुळे वाढली आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन एकही कोरोनाबाधित रुग्ण असू नये, यासाठी जिवाचे रान करून प्रयत्न करीत आहे. २८ मार्च रोजीदेखील मोठ्या संख्येत ट्रकने जाणारे बडनेरा शहराच्या आऊटरला पकडण्यात आले. चार दिवसांपूर्वीदेखील नाशिकहून ३२ लोक आले होते. चेकपॉइंट तसेच महामार्गावरील पेट्रोलिंग अधिक सतर्क करावी, अशी शहरवासीयाकडून मागणी होत आहे.बडनेºयातील पाच परतले परदेशातूनबडनेरा शहरातीलच पाच जण परदेशातून परत आल्याचे प्रशासनाने सांगितले. या सर्वांचा क्वारंटाइन कालावधी संपला आहे. त्यांना कुठलीच बाधा नव्हती. तथापि, त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष दिले जात आहे. ५८ जण मुंबई, पुण्याहून घरी परत आलेले आहे. लपूनछपून आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. लोकांनी याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन केले जात आहे.रेल्वे थांबवून उपयोग काय; झुंबड सुरूचकोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी प्रवासी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. पण, ट्रक व इतर वाहनांनी बडनेऱ्यात झुंबड दाखल होत आहे. संचारबंदीचा नियम तोडला जात आहे. बाहेरून येणाऱ्यांकडून संसर्गाची भीती व्यक्त होत आहे. अशांवर कठोर कारवाई करा, अशी मागणीदेखील पुढे येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस