शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील प्रत्येक विहिरीची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 14:28 IST

राज्याच्या नव्या भूजल अधिनियमानुसार आता प्रत्येक विहीर मालकास विहिरीची नोंदणी २० जानेवारी २०१९ च्या आत संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांकडे करणे बंधनकारक केले आहे. विहिरीचे नोंदणी प्रमाणपत्र २० वर्षांच्या कालावधीसाठी ग्राह्य असेल.

ठळक मुद्दे२० वर्षांसाठी परवानगी महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ मध्ये सुधारणा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या नव्या भूजल अधिनियमानुसार आता प्रत्येक विहीर मालकास विहिरीची नोंदणी २० जानेवारी २०१९ च्या आत संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांकडे करणे बंधनकारक केले आहे. विहिरीचे नोंदणी प्रमाणपत्र २० वर्षांच्या कालावधीसाठी ग्राह्य असेल. हा मसुदा व नियम सध्या राज्य शासनाचे संकेतस्थळावर नागरिकांच्या अभिप्रायासाठी खुला ठेवण्यात आलेला आहे.महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाद्वारा २५ जुलै, २०१८ रोजीच्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र भूजल नियम-२०१८ प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार प्रत्येक विहीर मालकास (विंधन विहीर/ खोदलेली विहीर/कूपनलिका) आपल्या विहिरीची नोंदणी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे १८० दिवसांच्या आत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विहिरीची मालकी ग्रामपंचायतीकडे अथवा अन्य संस्थेकडे असेल तरीही विहिरीची नोंदणी करणे आवश्यक असल्याची बाब या मसुद्यात नमूद आहे. याबाबतचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत विहिरीचे नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मात्र, प्रत्येक विहिरीसाठी स्वतंत्र नोंदणी करणे आवश्यक आहे. आता ६० मीटर खोलीची विहीर ही केवळ पिण्याच्या पाण्यासाठी खोदण्यास परवानगी देण्यात येईल आणि अशी परवानगी देण्याचा अधिकार राज्य भूजल प्राधिकरणास राहणार आहे.आस्तित्वातील खोल विहिरींमधून शेती किंवा औद्योगिक वापरासाठी भूजलाचा उपसा करण्यावर महसूल विभागामार्फत आता कर आकारणी करण्यात येईल. १०० चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक बांधकाम असेल तर, अशा बांधकामावर पाऊस पाणी साठवण संरचना बांधणे अनिवार्य आहे. त्याशिवाय अशा बांधकामास मान्यता व बांधकामास पाणीपुरवठा व भोगवटाचे प्रमाणपत्र दिले जाणार नसल्याची बाब मसुद्यात नमूद आहे.आता भूजलावर आधारित पीक योजनाराज्यातील अधिसूचित क्षेत्रामध्ये भूजलावर आधारित पीक योजना कृषी विभागामार्फत तयार करण्यात येईल. या पीक योजनेनुसारच पिके घेणे अनिवार्य राहणार आहे. जास्त पाणी लागणाऱ्या पिकांच्या लागवडीसाठी पिकाच्या पेरणीपूर्वी पाणलोटक्षेत्र जलसंपत्ती समितीकडे अर्ज करावा लागेल.या आहेत महत्त्वाच्या सुधारणा

  • राज्यात विंधन विहीर खोदकामाचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या कोणत्याही विंधन यंत्र मालकाला आपल्या यंत्राची नोंदणी जीएसडीएकडे करावी लागेल.
  • अयशस्वी झालेली विंधन विहीर/कूपनलिका ही कायमस्वरूपी बंद करण्याची जबाबदारी विंधन यंत्र मालकाची व जमीन मालकाची असेल.
  • सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या प्रभाव क्षेत्रामधील विहिरींना पूर्णत: अथवा अंशत: बंद करण्याचा अधिकार उपजिल्हाधिकारी यांना असेल.
  •  विहीर पूर्णत: अथवा अंशत: बंद करण्याचा निर्णय झाल्यास शेतातील उभ्या पिकांच्या भरपाईचा अर्ज उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करता येईल.
टॅग्स :Governmentसरकार