शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्याची पत्नी ‘मिसिंग’; ठाणेदारांवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 20:44 IST

Amravati News आपल्या पत्नीला येवदा येथील ठाणेदार तथा सहायक पोलीस निरीक्षक अमूल बच्छाव यांनी पळवून नेल्याचा खळबळजनक आरोप अकोला जिल्ह्यातील एका तरुण अभियंत्याने केला.

ठळक मुद्देपतीची पत्रकार परिषदठाणेदार मुख्यालयी संलग्न, एसडीपीओंकडे चौकशी

अमरावती : आपल्या पत्नीला येवदा येथील ठाणेदार तथा सहायक पोलीस निरीक्षक अमूल बच्छाव यांनी पळवून नेल्याचा खळबळजनक आरोप अकोला जिल्ह्यातील एका तरुण अभियंत्याने केला. याबाबत नोव्हेंबर २०२१ मध्येच तक्रार केली. त्यानंतर १० डिसेंबर रोजी बुलडाणा येथे अमूल बच्छाव यांच्या नावाचा संदर्भ देत एका अज्ञात व्यक्तीने आपल्याला धमकावले. या संपूर्ण प्रकरणाबाबत आपण १८ फेब्रुवारी रोजी अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नोंदविली असून, बच्छाव यांच्याकडून आपल्यासह आपल्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप त्या अभियंत्याने केला आहे.

      दरम्यान, आलेल्या तक्रार अर्जाची दखल घेत याप्रकरणाची चौकशी दर्यापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे, तर, बच्छाव यांना मंगळवारीच तातडीने नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. अमूल बच्छाव यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या अभियंत्याने बुुधवारी दर्यापूर येथे पत्रपरिषद घेतली.

आरोपानुसार, बच्छाव यांनी पदाचा गैरवापर करून बऱ्याच महिलांना प्रेमजाळ्यात ओढले. बच्छाव यांनी आपल्या पत्नीशी विवाहबाह्य संबंध प्रस्थापित केल्याने घटस्फोट घेतला. मात्र, कुटुंबीय व मुलाच्या काळजीपोटी आपण सारे काही पचवून तिच्याशी १९ नोव्हेंबर २०२१ रोजी पुनर्विवाह केला. अगदी दोन दिवसांनी २२ नोव्हेंबर रोजी ती बेपत्ता झाली. तिला बच्छाव यांनीच पळवून नेल्याचा दाट संशय आपल्याला असल्याचा आरोपदेखील अभियंत्याने केला. बच्छाव यांनी ते सर्व आरोप नाकारले आहेत. त्याबाबत अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी