शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या; लिहून ठेवली बहिणीच्या नावे चिठ्ठी

By प्रदीप भाकरे | Updated: April 12, 2023 18:51 IST

Amravati News अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने आपल्या खोलीवर गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १२ एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली.

प्रदीप भाकरे अमरावती : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने आपल्या खोलीवर गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १२ एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, गाडगेनगर पोलिसांनी त्याच्या मृतदेहाजवळून एक छोटीसी चिट जप्त केली आहे. त्यात त्याने ‘चिनूजवळ मोबाइल देजा, चिनू सर्वांना वाचून दाखवजो’, असे नमूद करीत एका नोट ॲपचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे मोबाइलवरील त्या ॲपवरून त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर येणार आहे. अनुराग मोहन तिखिले (२३, रा. चांदूरबाजार) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तर चिटमध्ये उल्लेखलेली चिनू ही त्याची बहिण आहे.

             गाडगेनगर पोलिसांनुसार, अनुराग हा कठोरा मार्गावरील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत होता. तो कठोरा मार्गावरील हरिओम कॉलनी येथे उताणे यांच्या घरी भाड्याने खोली करून राहत होता. बुधवारी दुपारी अनुरागने खोलीवर गळफास लावला. सोबत राहणारा मित्र खोलीवर आल्यावर तो धक्कादायक प्रकार उघड झाला. मित्राने अन्य काही सहकाऱ्यांच्या मदतीने अनुरागला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी पोलिसांना एक सुसाईड नोट आढळून आली. पोलिसांनी अनुरागचा मोबाइल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.पोलीस करणार तपासपोलिसांनुसार, अनुरागच्या मोबाईलमध्ये नोट टेकिंग ॲप असेल. त्यात त्याने डिजिटल सुसाईड नोट लिहिलेली असू शकते. मृताने बहिणीच्या नावे लिहिलेल्या छोट्याशा चार ओळीच्या चिटमध्ये पासवर्ड देखील नमूद केला आहे. त्यामुळे पोलीस मृताच्या बहिणीकडून मोबाईलमधील त्या नोटमधील वास्तव जाणून घेणार आहेत. मात्र, तुर्तास तिखिले कुटुंबावर अनुरागच्या आत्महत्येने दु:खाचा डोंगर कोसळल्याने पोलीस प्रथम शवविच्छेदन व अन्य प्रक्रियेला प्राधान्य देणार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूStudentविद्यार्थी