शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

परतवाड्यातील वसतिगृहावर वन्यजीव विभागाचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 05:00 IST

परतवाडा येथील वनविभागाच्या आवारात लाखो रुपये खर्च करून २००८ मध्ये ही वसतिगृहाची इमारत उभारली गेली. यात मुलांना राहण्याकरिता खोल्या आणि स्वतंत्र किचन आणि डायनिंगची व्यवस्थाही करण्यात आली. मुलांच्या राहण्याच्या अनुषंगाने आवश्यक सर्व सोयी व वसतिगृहात उपलब्ध करून दिल्या गेल्या. मुलांचे वसतिगृह म्हणूनच ही इमारत साकारली गेली.

ठळक मुद्देवनकर्मचाऱ्यांची मुले प्रतीक्षेत, २००८ मध्ये इमारतीचे बांधकाम पूर्ण

  लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाटातील अतिदुर्गम भागात कार्यरत वनकर्मचाऱ्यांच्या मुलांकरिता परतवाडा येथे बांधण्यात आलेल्या वसतिगृहावर ११ वर्षांपासून वन्यजीव विभागाचे अतिक्रमण कायम आहे.परतवाडा येथील वनविभागाच्या आवारात लाखो रुपये खर्च करून २००८ मध्ये ही वसतिगृहाची इमारत उभारली गेली. यात मुलांना राहण्याकरिता खोल्या आणि स्वतंत्र किचन आणि डायनिंगची व्यवस्थाही करण्यात आली. मुलांच्या राहण्याच्या अनुषंगाने आवश्यक सर्व सोयी व वसतिगृहात उपलब्ध करून दिल्या गेल्या. मुलांचे वसतिगृह म्हणूनच ही इमारत साकारली गेली.वसतिगृहाची इमारत पूर्ण झाल्यानंतर सन २००८-०९ मध्ये उपवनसंरक्षकांनी अधिनस्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना याची माहितीही कळविली. वनपाल-वनरक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनाही या पत्राच्या प्रती दिल्या गेल्यात.मेळघाटातील वनक्षेत्रात काम करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक दृष्टिकोनातून परतवाडा मुख्यालयी एक शासकीय वसतिगृह बांधण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांची मुले ही इयत्ता सातवी ते बारावी या वर्गात शिकत आहेत, त्यांनी या वसतिगृहाचा त्यांचे पाल्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने राहण्याच्या सोयीचा फायदा घ्यावा, असे नोव्हेंबर २००८ च्या पत्रात उपवनसंरक्षक सिपना वन्यजीव विभाग परतवाडा यांनी म्हटले आहे. पण, २०२० संपायला आले असले तरी ते वसतिगृह सुरू करण्यात आलेले नाही. याबाबत तातडीने कार्यवाही होऊन मुलांच्या अडचणी दूर कराव्या, असा मतप्रवाह आहे. 

११ वर्षांपासून इमारत ताब्यातपरतवाडा येथे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल व सिपना वन्यजीव विभागाचे कार्यालय ११ वर्षांपूर्वी एकाच इमारतीत दोन स्वतंत्र भागात होते. वसतिगृहाची इमारत २००८ मध्ये पूर्ण होताच गुगामल वन्यजीव विभागाने आपले बस्तान, वसतिगृहाच्या इमारतीत हलविले. दीड-दोन वर्षांपूर्वी गुगामल वन्यजीव विभागाचे कार्यालय चिखलदऱ्यात हलविले गेले आणि या वसतिगृहाच्या इमारतीत मेळघाट वन्यजीव विभागाच्या विभागीय वनाधिकाऱ्यांचे कार्यालय थाटले गेले. यात अधिकारी बदलले, कार्यालयाचे नाव बदलले, पण मुलांकरिता बांधले गेलेले वसतिगृह त्यांना अजूनही उपलब्ध होऊ शकले नाही. या इमारतीवरील अतिक्रमण वन्यजीव विभागाने ११ वर्षांपासून कायम ठेवले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग