शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

अतिक्रमण कारवाई, नागरिक रस्त्यावर

By admin | Updated: May 30, 2014 23:22 IST

महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या चिलमछावणी, राजीव गांधीनगर, चमन शाहवली या ठिकाणी सन १९८६ पासून वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांचे अतिक्रमण हटवू नये, यासाठी या परिसरातील

अमरावती : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या चिलमछावणी, राजीव गांधीनगर, चमन शाहवली या ठिकाणी सन १९८६ पासून वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांचे अतिक्रमण हटवू नये, यासाठी या परिसरातील शेकडो नागरिकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. सन १९८६ सालापासून शहरातील चिलमछावणी, राजीव गांधीनगर, चमन शाहवली या परिसरातील झोपडपट्टीमध्ये मोलमजुरी करुन सुमारे ५00 नागरिक वास्तव्य करीत आहेत. महसूल विभागाच्या नझुल शिट क्रमांक ७, प्लॉट नं. २/४ या नझूलच्या जागेवर राहणार्‍या वरील गोर गरीब कुटुंबांना शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्याबाबत जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासनाने ही कारवाई सुरु केल्यामुळे चिलमछावणी परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शासनाने सुमारे ३0 वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या या झोपडपट्टीतील नागरिकांना घरकुलाचा लाभ द्यावा त्यानंतरच येथील अतिक्रमण काढण्यात यावे. प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची नोटीस बजाविल्याने मोल मजुरी करुन वास्तव्य करीत असलेल्या या गरीब जनतेने निवार्‍याचा आश्रय कोठे घ्यावा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शासन गरिबांना निवार्‍याची सुविधा व्हावी म्हणून घरकुलाची योजना राबवितो; मात्र याचा लाभ गरजूंना मिळत नाही. बाब लक्षात घेऊन शासनाने अगोदर झोपडपट्टीतील या नागरिकांना राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करुन द्यावी. कुठल्याही परिस्थितीत या परिसरातील अतिक्रमण हटवू देणार नाही या विषयासाठी चिलमछावणी परिसरातील सुमारे ५00 नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. उपोषणकर्त्यांमध्ये अफजल भाई, शफीक राजा, शाहीस्ता परवीन, शेख जाकीर, गफ्फार खां, शेख फारूख, शेख युसूफ, शेख सुभान, आशा कोबळे, शेख जावेद आदींसह परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)