अमरावती : जिल्हा परिषदेचे नवे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून मंगळवारी सुनील पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांनी पद्भार घेतल्यानंतर अमरावती जिल्ह्यात आपण नव्यानेच प्रशासकीय कामकाज जिल्हा परिषदेच्या माध्यामतून करणार असलो तरी मेळघाटातील कुपोषण, शेतकरी आत्महत्या, शिक्षण आरोग्य, पाणी, रस्ते असे विकासाचे प्रश्न सोडविण्यास आपली प्राथमिकता राहील, अशी माहिती 'लोकमत'शी बोलताना पाटील यांनी दिली.सन १९८७ मध्ये सुनिल पाटील यांनी पंढरपुर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून पहिल्यांना काम केले आहे. यासोबतच त्यांची बरीचशी प्रशासकीय सेवा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न, या भागास रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठाल सिंचन अशा सर्वच कामाना प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शेतकरी आत्महत्या होऊ नयेत यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत जास्तीत जास्त योजना राबवून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयन्न केले जातील असे सुनील पाटील यांनी स्पष्ट केले. मेळघाटातील संपर्क साठीची यंत्रणा अधिक सक्षम करण्यावरही आपला भर राहील, असे ते म्हणाले
मेळघाटातील संपर्क यंत्रणा सक्षम करणार
By admin | Updated: July 1, 2015 00:42 IST