शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वीजसेवा देणे बंद करणार, अभियंता संघटनेचा इशारा; वीज अभियंत्यांना मारहाणीचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 14:30 IST

महावितरणच्या अभियंत्यांवर हल्ल्याच्या घटना आता सामान्य म्हणाव्या एवढ्या संख्येने उजेडात येत आहेत. अशा प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास वीजसेवा देणे बंद करण्याचा इशारा अभियंत्यांनी दिला आहे.

- वीरेंद्रकुमार जोगी 

अमरावती : महावितरणच्या अभियंत्यांवर हल्ल्याच्या घटना आता सामान्य म्हणाव्या एवढ्या संख्येने उजेडात येत आहेत. अशा प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास वीजसेवा देणे बंद करण्याचा इशारा अभियंत्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, मागील महिनाभरात वीज कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या चार घटना अमरावती विभागात नोंदविण्यात आल्या आहेत. 

अचलपूर तालुक्यातील कांडली येथे बुधवारी अचलपूर विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र वाघमारे यांना ग्रामपंचायत सदस्य गंगा धंदारे यांनी मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले. यवतमाळ वीज परिमंडळ अंतर्गत मारेगाव येथे अवैध वीजजोडणी मोहिमेदरम्यान कनिष्ठ अभियंता सस्नेह वासेकर यांच्यावर हल्ला करण्यात आला. यात ते गंभीर जखमी झाले, तर २८ नोव्हेंबर रोजी पुसद येथे सहायक अभियंता सुदर्शन इवनाते यांना मारहाण करण्यात आली. यात इवनाते गंभीर जखमी झाले. घटनेच्या दिवसापासून ते आयसीयूमध्ये आहेत. यासोबतच अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे एका वीज कर्मचाºयाला मारहाण केल्याची घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. या घटनांमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोषींवर कारवाईची मागणीवीज अभियंत्यांना मारहाण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे नोंदवावे, अशी मागणी महावितरणच्या अभियंत्यांच्या एसईए (सबऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशन) या संघटनेने केली आहे. संघटना या विषयात लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार आहे. 

कोणतेही वैयक्तिक वैमनस्य नसताना अभियंत्यांना मारहाण केली जात आहे. अचलपूर परिमंडळात मारहाणीचा निषेध नोंदवून वीजसेवा न पुरविण्याचा निश्चय संघटनेने केला आहे.- गजानन गोदे, सहसचिव, एसईए

टॅग्स :mahavitaranमहावितरण