शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यात चुकीच्या मीटर रीडिंगने वीज ग्राहक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 12:50 IST

Amravati : वीज ग्राहकांचे मीटर रीडिंग न घेताच बिलातून अवास्तव वसुली

लोकमत न्यूज नेटवर्क बडनेरा : जुनी वस्ती परिसरात बऱ्याच वीज ग्राहकांचे मीटर रीडिंग न घेताच बिलातून अवास्तव वसुली केली जात असल्याची ओरड ग्राहकांमध्ये आहे. यामधून वीज ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वीज बिल दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयाच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत. मीटर रीडिंग योग्य घेतले जावे, अशी मागणी प्रकर्षाने पुढे आली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेण्याची आवश्यकता आहे.

जुनी वस्ती परिसरात महावितरणच्या ग्राहकांना चुकीची वीज बिले येत असल्याची ओरड ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. महावितरणच्या मीटर रीडिंगचे कंत्राट असलेल्या एजन्सीकडून आकडे नमूद करून न घेताच चुकीचे रीडिंग वीज बिलावर टाकले जात असल्याचे वीज ग्राहकांमध्ये बोलले जात आहे. चुकीच्या रीडिंगचा फटका वीज ग्राहकांना बसत आहे. अवास्तव युनिट टाकले जात असल्याने मोठ्या रकमेची बिले ग्राहकांना येतात. त्यानंतर ग्राहकांना चुकीच्या रीडिंगमुळे वीज

बिलाच्या दुरुस्तीकरिता महावितरणच्या कार्यालयात चकरा माराव्या लागतात. बिलांच्या दुरुस्तीसाठी बराच वेळ लागतो. काही प्रसंगी ग्राहकांना बिल भरून टाका, असेदेखील सांगितले जाते. एकूणच मीटर रीडरच्या चुकीमुळे वीज ग्राहकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

ग्राहकांना त्रासदायक ठरणाऱ्या या बाबीकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे बोलले जात आहे. याबाबत संबंधित महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता, ग्राहकांकडून आलेल्या तक्रारी लगेचच आमच्याकडून मार्गी लावल्या जात असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :electricityवीजAmravatiअमरावती