अमरावती : महापालिकेने विजेचे आॅडिट सुरु केले असून आतापर्यंत खांबांवरील अनावश्यक ९७५ दिवे काढण्यात आले आहेत. ही मोहीम वीज बचतीसाठी असली तरी महापालिका तिजोरी वर्षाकाठी ३५ लाखांची बचत होणार आहे.महानगरात पाचही झोनमध्ये विद्युत खांबांवर असलेले अनावश्यक दिवे काढण्याची मोहीम महापालिका प्रकाश विभागाने हाती घेतली आहे. मागील दोन महिन्यांपासून ही मोहिम सुरु असून आतापर्यंत ९७५ दिवे निघाले आहेत. काही प्रभागात लोकप्रतिनिधींची मर्जी आणि स्थानिक राजकारण सांभाळण्याच्या अनुषंगाने खांबावर दिवे लावण्यात आले आहे. खांबावरील पथदिवे देखभाल, दुरुस्तीचा कंत्राट मे. ब्राईट ईलेक्ट्रॉनिक्स या खासगी कंपनीला सोपविण्यात आला आहे. महापालिकेला महिन्याकाठी ७० ते ७५ लाख रुपयांची वीजेची देयके असल्याची माहिती आहे. परिणामी विजेचे आॅडिट करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी घेतला. झोन कार्यालय, पथदिवे, मुख्य कार्यालय, शिक्षण विभाग कार्यालय आदी परिसरात वीजेची बचत करण्यासाठी अनावश्यक दिवे काढले जात आहे. पहिल्या टप्प्यात खांबावरील दिवे कमी केले जात आहे. त्यानंतर कार्यालयांना लक्ष्य केले जाणार आहे. दररोज प्रभाग निहाय खांबावरील दिवे काढून तसा अहवाल प्रकाश विभागाला सादर केला जात आहे. शहरातील मुख्य मार्ग, चौकांचा परिसरातही खांबावर अनावश्यक दिवे असून ते काढण्याची मोहिम सुरु आहे. अनावश्यक दिवे काढताना कंत्राटदारांचे कर्मचारी सोबत राहत असून तशी नोंद घेतली जात आहे. शहरात महापालिकेचे ३३९५ तर वीज वितरण कंपनीच्या २८, ९०८ खांबावर दिवे असल्याची नोंद आहे.शहरात आहेत १४ दिव्यांचे प्रकार४४० वॅट ट्युबलाईट, १२५ वॅट मक्युरी व्हेपर दिवे, २५० वॅट मर्क्यरी व्हेपर दिवे, ७० वॅट सोडीयम व्हेपर दिवे, १५० वॅट सोडीयम व्हेपर दिवे, २५० वॅट सोडीयम व्हेपर दिवे, १५० वॅट सोडीयम हलाइड दिवे, ४०० वॅट मेटल हलाईड दिवे, ४/२४ उर्जा बचतीचे दिवे, ४/१४ उर्जा बचतीचे दिवे, २/१४ उर्जा बचतीचे दिवे, १८ वॅटचे स्ट्रिट लाईट सौर उर्जेवरील दिवे आहेत.आमसभेत झालेल्या निर्णयानुसार वीज बचत करण्यासाठी अनावश्यक दिवे काढले जात आहे. कंत्राटदार आणि प्रकाश विभागाचे कर्मचारी संयुक्तपणे दिवे काढत आहेत. दोन महिन्यांपासून ही मोहीम सुरु आहे. अनावश्यक दिवे काढेपर्यंत ही कार्यवाही सुरुच राहील.- अशोक देशमुख,उपअभियंता, प्रकाश विभाग.
महापालिकेत विजेचे 'आॅडिट'
By admin | Updated: February 24, 2015 01:05 IST