शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या नियुक्ती प्रस्तावांसाठी आठ आठवड्यांची डेडलाइन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 19:52 IST

खासगी व्यवस्थापनाच्या सहायक शिक्षक, शिक्षणसेवक व सेवक इत्यादी नियुक्त्यांना मान्यता देण्यासाठी आठ आठवड्यांची कालमर्यादा ठरवून देण्यात आली. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हा निर्णय घेतला.

 अमरावती - खासगी व्यवस्थापनाच्या सहायक शिक्षक, शिक्षणसेवक व सेवक इत्यादी नियुक्त्यांना मान्यता देण्यासाठी आठ आठवड्यांची कालमर्यादा ठरवून देण्यात आली. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हा निर्णय घेतला. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे संबंधित संस्थांकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यांची छाननी करून आठ आठवड्यांच्या आत संबंधित संस्था-विद्यालयांना कळविणे क्षेत्रिय अधिकाºयांना बंधनकारक करण्यात आले आहे.महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार शैक्षणिक संस्थांनी शिक्षणाधिकाºयांकडून पदभरती करण्याकरिता जाहिरातींसाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, शिक्षणाधिकारी संस्थेने केलेल्या अर्जावर काहीही कार्यवाही करीत नाही, असे निरीक्षण शालेय शिक्षण विभागानेही नोंदविले. अशाच एका प्रकरणात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने न्याय निर्णय देताना शिक्षणाधिकाºयांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. जिल्हा परिषद , महापालिका व अन्य स्थानिक प्राधिकरणाचे निर्णय शिक्षणाधिकारी वेळेत घेत नसल्याने उच्च न्यायालायात दरवर्षी शेकडो याचिका दाखल करण्यात येतात, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालायाने या सर्व शिक्षणाधिकाºयांना निर्देश दिले आहेत. त्या निर्णयाचा आधार घेत शैक्षणिक संस्थाकडून मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षणसेवक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीस मान्यता देण्यासाठी प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून आठ आठवड्यांच्या आत त्यावर निर्णय घेऊन संबंधित संस्थाप्रमुखास कळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विभागीय शिक्षण संचालक, पा्रथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, नगरपालिका व महानगरपालिकांचे प्रशासन अधिकारी व शिक्षणाधिकाºयांकडे ही जबाबदारी आहे.

...तर गंभीर दखल घेऊन्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे संबंधित संस्थांकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यांची छाननी करून आठ आठवड्यांच्या आत संबंधित संस्था-विद्यालयांना निर्णय न कळविल्यास, त्याची गंभीर दखल घेण्यात येईल, अशी तंबी शिक्षणाधिकाºयांना देण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षकAmravatiअमरावतीEducation Sectorशिक्षण क्षेत्र