लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : जुळ्या शहरात कोरोनाबाधित आढळलेल्या दोघांच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण प्रशासनाने केले आहे. त्यापैकी आठ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.परतवाडा शहरात सापडलेले दोन कोरोना रुग्णांचे कुटुंबीय व जवळच्या २७ व्यक्तींचे हॉस्पिटलमध्ये विलगीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांच्या संपर्कातील ३१ नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. याशिवाय निकटच्या सर्व व शेजारी राहणाऱ्या ७२ नागरिकांना गृह विलगीकरण करण्यात आले आहे. याशिवाय प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांना फिरण्यास व प्रशासनाच्या परवानगीशिवाय ये-जा करण्यास मनाई करण्यात आली असल्याची माहिती अचलपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी दिली.अहवालाची प्रतीक्षादोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांत एकच खळबळ उडाली. त्यानंतर प्रशासनाने अनेकांचे संस्था, घर आणि हॉस्पिटलमध्ये विलगीकरण केले. काही जणांची तपासणी करण्यात आली असून, आरोग्य विभागाकडील अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.
परतवाड्यातील आठ अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST
परतवाडा शहरात सापडलेले दोन कोरोना रुग्णांचे कुटुंबीय व जवळच्या २७ व्यक्तींचे हॉस्पिटलमध्ये विलगीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांच्या संपर्कातील ३१ नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. याशिवाय निकटच्या सर्व व शेजारी राहणाऱ्या ७२ नागरिकांना गृह विलगीकरण करण्यात आले आहे.
परतवाड्यातील आठ अहवाल निगेटिव्ह
ठळक मुद्दे२७ रुग्णालयात : ७२ जणांचे गृहविलगीकरण