आयुक्तांचे आदेश : महापालिकेच्या दोन संकुलांचाही समावेशअमरावती : अधिकारी, कर्मचाऱ्यांना वठणीवर आणणारे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शहरवासियांना शिस्त आणि नियमांचे अनुकरण करण्यासाठी संकुलातील वाहनतळ शोधमोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आठ व्यापारी संकुलातील अतिक्रमण तोडण्याचे आदेश शुक्रवारी त्यांनी दिले आहेत.यात स्थानिक नमूना स्थित चुन्नू मुन्नू कापडाचे दुकान, मुन्शी मार्केट, बडनेरा मार्गावरील अंबापेठ परिसरातील खत्री कॉम्प्लेक्स, अंबादेवी मार्गावरील टांक कॉम्प्लेक्स, बसस्थानक मार्गावरील हॉटेल रामगिरी, सरोज चौकातील बालाजी मार्केट तसेच गाडगेनगर येथील सीटी सेंटर मार्केटचा समावेश आहे. या संकुलाच्या संचालकांना अतिक्रमणबाबत पंधरा दिवसाची नोटीस बजावली आहे. महापालिका संकुलातील जे अँड डी मॉल, जवाहर मार्गावरील खत्री कॉम्प्लेक्स येथील अतिक्रमण पाडण्याचे आदेश आहेत.न्यायालयात कॅव्हेट दाखलशहरात व्यापारी संकुलातील वाहनतळ गायब झाले आहेत अशा संकुलाचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात आठ संकुलाचे अतिक्रमण भुईसपाट केले जाणार आहे. तत्पूर्वी अतिक्रमण पाडण्याबाबत न्यायालयाचा स्थगनादेश येऊ नये यासाठी न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे.वाहनतळाच्या जागा गिळंकृत करणाऱ्या संकुलाची यादी तयार झाली आहे. त्यानुसार या संकुलाचे वाहनतळ शोधून काढण्यासाठी निर्देश दिले आहेत. सहाय्यक संचालक नगर रचना विभागाला अतिक्रमण तोडण्याची कारवाई सोपविण्यात आली आहे. - चंद्रकांत गुडेवार,आयुक्त, महापालिका.
शहरातील आठ संकुलांचे अतिक्रमण होणार भुईसपाट
By admin | Updated: May 23, 2015 00:32 IST