आरोपी अटकेत : शिंदी येथे आढळला मृतदेहपथ्रोट : मित्राने आठ लाख रुपये दिले नाही म्हणून मित्रानेच मित्राला बेदम मारहाण करुन त्याची निर्घृण हत्या केल्यानंतर मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदी बु. येथे घडली. पथ्रोट पोलिसांनी आरोपीला आकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले.आकोट तालुक्यातील वडाळी देशमुख येथील संदीप वऱ्हेकर, अनूज मालधुरे, ताजअली ऊर्फ टिल्लू हे तिघे कट्टर मित्र होते. ताजअली ऊर्फ टिल्लू याचे पाच भाऊ आकोटला राहातात. ताजअलीने भाऊ शफाकत अली याला सांगितले की. माझे दोन मित्र संदीप वऱ्हेकर व अनुज मालधुरे हे नाशिकहून येत असल्यामुळे मी त्यांना भेटण्यासाठी जात आहे. त्यानंतर टिल्लू घरुन निघून गेला. दोन-तीन दिवसांनंतर शफाकत अली तायरअली (३७ रा. आकोट) हा अनुज मालधुरेला भेटला असता त्याने टिल्लूबाबत चौकशी केली. तेव्हा अनुजने तुझा भाऊ संदीप वऱ्हेकरसोबत गेला असून संदीप वऱ्हेकर तुझ्या भावाला आठ लाख रुपयांची मागणी करीत असल्याचे सांगितले. टिल्लूच्या भावाने संदीप वऱ्हेकरची चौकशी केली असताना टिल्लूचा दुसरा भाऊ रियाज अली याला संदीप वऱ्हेकर भेटला. परंतु संदीपने रियाज अलीला टिल्लू विषयी माहिती दिली नाही. त्यानुसार रियाज अलीने २९ मे रोजी आकोट पोलीस ठाण्यात टिल्लू हरविल्याची तक्रार दिली.
आठ लाखांसाठी मित्रानेच केला घात
By admin | Updated: June 10, 2015 00:13 IST