शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांत २४ मध्यम प्रकल्पांत वाढला २२ टक्क्यांनी पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 19:02 IST

गत आठ ते दहा दिवसांपासून सार्वत्रिक होत असलेल्या पावसामुळे २४ मध्यम प्रकल्पांचा पाणीसाठा २२ टक्क्यांनी वाढला आहे.

अमरावती - गत आठ ते दहा दिवसांपासून सार्वत्रिक होत असलेल्या पावसामुळे २४ मध्यम प्रकल्पांचा पाणीसाठा २२ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे सदर धरणातून ज्या-ज्या तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो, तेथील यंदाची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.७ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ४३.७५ टक्के पाणीसाठा झाला. २९ आॅगस्ट रोजीच्या आकडेवारीनुसार २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी २१.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. आठवडाभरात २२.१ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली. यंदा नऊ मोठ्या प्रकल्पांत फक्त २४.८८ टक्के पाणीसाठा आहे. मोठे प्रकल्प जरी भरले नसले तरी मध्यम प्रकल्पात यंदा चांगला पाणीसाठा झाला. आणखी दमदार पावसाची शक्यता असल्याने हे प्रकल्प शंभर टक्के भरतील, अशी अपेक्षा आहे. अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांतसुद्धा चांगला पाणीसाठा झाला असून, शहानूर मध्यम प्रकल्पात ६८.६१ टक्के पाणीसाठा आहे. चंद्रभागा मध्यम प्रकल्पात ७८.५७ टक्के, पूर्णा ६२.५४ टक्के, सपन सर्वाधिक ८५.२८ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस मध्यम प्रकल्पांत ७०.५५ टक्के, सायखेडा १०० टक्के, गोकी ३३.०१ टक्के वाघाडी २९.४४ टक्के, बोरगाव ४१.६० टक्के, नवरगाव ८९.०२ टक्के, अडाण ५.८६ टक्के, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा ३.७८ टक्के, मोर्णा १३.२७ टक्के, वाशीम जिल्ह्यातील एकबुर्जी प्रकल्पात २७.८२ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा प्रकल्पात ५१.५२ टक्के, पलढग १०० टक्के, मस ६०.९० टक्के, मन ३३.८३ टक्के, तोरणा ४२.२१ टक्के, तर उतावळी प्रकल्पात २८.३५ टक्के पाणीसाठा आहे.चार मध्यम प्रकल्पांना कोरडचार मध्यम प्रकल्पांची कोरड कायम असून, या प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा असल्याची नोंद जलसंपदा विभागाने घेतली आहे. सदर प्रकल्पांची घळभरणी यापूर्वीच झाली. मात्र, पाणीसाठा का साचला नाही, यावर जलसंपदा विभाग निरुत्तर राहिले़ प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस नसल्याचे कारण समोर केले जात आहे. शून्य टक्के पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांमध्ये  अकोेला जिल्ह्यातील उमा मध्यम प्रकल्प, घुंगशी बॅरेज, वाशीम जिल्ह्यातील सोनल मध्यम प्रकल्प, तर बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीDamधरण